Monday, December 23, 2024
Homeसामाजिकतरूणाई सरसावली मदतीला मनसर...

तरूणाई सरसावली मदतीला मनसर…

रामटेक – राजु कापसे

दिनांक 24 ऑक्टोबर 2022 रोजी आरिकाता शिझुए वृद्धाश्रम,मनसर येथे अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे रामटेक परिसरातील तरूणांनी दिवाळी सण वृद्धांसोबत साजरी करण्याचे ठरविले आणि त्यांनी एकत्र येऊन आतिषबाजी वर होणारा वायफळ खर्च योग्य कारणी लावण्याचे ठरविले ही अत्यंत कौतुकास्पद बाब असून इतरांनी देखील या पासून प्रेरणा घ्यावी अशी आहे.

सर्व युवा मित्रांनी बाजारातून वृद्धांच्या गरजेनुसार वस्तू खरेदी करून शाल,मोजे,झेंडू बाम, बिस्किटे व मिठाई इ.वस्तूंचे वृद्धाश्रमात वाटप केले.तुषार चव्हाण,नंदू चाफले,रोहित देशमुख,सुप्रित चाफले,धिरज मंदेवार,रजत पोटे, जितेंद्र मानकर, सचिन ठेंगरी,शुभम दिवटे, प्रशांत बोराडे, अभिनंदन भोपे,सुमित वडिवे,ऋषभ तिवारी,व प्रमोद ठाकरे या तरूणांनी प्रदूषण न करता वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत आदर्श व आनंदाची दिवाळी साजरी केली हे विशेष.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: