वाशीम जिल्ह्यातील मानोरा तहसील मध्ये महसूल सहाय्यक पदावर कार्यरत असलेले अनंत किसन राठोड वय वर्ष 34 याला वाशीम लाचलुचपतविरोधी पथकाने सुमारे दीड लाखाची लाच घेतांना रंगेहात पकडले. 2 महिन्यांपूर्वी ह्याच तहसील मध्ये ह्याच पदावरील अव्वल कारकून मोहन तिडके ह्याला 30,000 रुपयांची लाच घेतांना अटक केली होती. या प्रकरणी राठोड यांच्याविरुद्ध मानोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिअलालेल्या माहितीनुसार, 59 तक्रारदार यांचे शेतीचे मालकीचे सेल सर्टिफिकेट पुतण्या यांचे नावाने देण्याकरिता 1,50,000/- रुपयाची पडताळणी दरम्यान मागणी करून स्विकारण्यास तयारी दर्शवली असल्याने काल दि. 9/8/2023 रोजी प्रत्यक्ष सापळा कारवाई ही तक्रारदार यांचे घरी आयोजित केली असता आलोसे यांनी फिर्यादी यांच्याकडून लाचेचे 1,50,000/-रु स्वीकारले वरून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आलोसे यांचे विरुद्ध पोस्टे मानोरा येथे गुन्हा दाखल केला आहे.
सक्षम अधिकारी…मा. जिल्हाधिकारी सा. वाशिम
सापळा व तपास अधिकारी
श्री. सुजित कांबळे,
पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. वाशिम. +919922243438
पर्यवेक्षण अधिकारी
श्री.गजानन शेळके,
पोलीस उपअधीक्षक,
ला.प्र.वि. वाशिम.
सापळा कार्यवाही पथक
श्री.गजानन शेळके
पोलीस उपअधीक्षक
श्री. सुजित कांबळे, पोलीस निरीक्षक, पोहवा विनोद मार्कंडे, नितीन टवलारकार, दुर्गादास जाधव, राहुल व्यवहारे, पोना विनोद अवगळे , योगेश खोटे, रवींद्र घरत, चालक नावेद शेख. सर्व नेमणूक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम.
मार्गदर्शन –
१) मा. श्री.मारूती जगताप, पोलीस अधीक्षक ,
२) मा. श्री देविदास घेवारे,अप्पर पोलीस अधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.