वाशीम जिल्हा परिषेदच्या अतर्गत येणाऱ्या एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय मानोरा येथील कनिष्ठ सहाय्यककाला वाशिम चे DYSP गजानन शेळके, पोलीस निरीक्षक सुजित कांबळे, बालाजी टिप्पलवाड यांचा पथकाने 35 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. मनोज जगन्नाथ भोजापुरे, वय 55 वर्ष, व संतोष आत्माराम वानखेडे, वय 37 वर्षे, व्यवसाय मजुरी असे पकडण्यात आलेल्यांची नावे असून त्यांच्यावर मानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीवरून, 26 वर्षीय तक्रारदार यांची पत्नी हिला अंगणवाडी मदतनीस या पदावर निवड करून देण्याकरिता 50,000/- रुपये लाच रक्कमेची मागणी करून तडजोडी अंती 35,000/- रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यावरून आज रोजी प्रत्यक्ष पंचायत समिती कार्यालय मानोरा येथे आयोजित सापळा कार्यवाही दरम्यान आलोसे यांनी फिर्यादी यांच्याकडून लाच रक्कम 35,000/-रु स्वीकारले वरून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आलोसे यांचेविरुद्ध पोस्टे मानोरा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सक्षम अधिकारी
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सा. जिल्हा परिषद वाशिम. जिल्हा वाशिम
सापळा व तपास अधिकारी
श्री. बालाजी तिप्पलवाड
पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. वाशिम.
7020155311
पर्यवेक्षण अधिकारी*
श्री.गजानन शेळके,
पोलीस उपअधीक्षक,
ला.प्र.वि. वाशिम.
सापळा कार्यवाही पथक
श्री.गजानन शेळके
पोलीस उपअधीक्षक
श्री. सुजित कांबळे, पोलीस निरीक्षक,
श्री. बालाजी तिप्पलवाड,पोलीस निरीक्षक
पोहवा असिफ शेख, विनोद अवगळे, नितीन टवलारकार, योगेश खोटे, राहुल व्यवहारे, रवींद्र घरत, चालक नावेद शेख. सर्व नेमणूक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम.
मार्गदर्शन –
१) मा. श्री.मारूती जगताप, पोलीस अधीक्षक ,
२) मा. श्री देविदास घेवारे,अप्पर पोलीस अधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.
सर्व नागरीकांना आवाहन कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग, वाशिम पोलीस उप अधीक्षक
@दुरध्वनी क्रं – 07252 235933
@टोल फ्रि क्रं 1064
मोबाईल क्र.9028200444