Sunday, November 17, 2024
Homeराज्यमनोज जरांगे पाटील यांची सोमवारी खामगावात जाहीर सभासभास्थळी जय्यत तयारी ः जिल्हाभरातून...

मनोज जरांगे पाटील यांची सोमवारी खामगावात जाहीर सभासभास्थळी जय्यत तयारी ः जिल्हाभरातून मराठा समाज बांधव एकवटणार…

खामगाव – हेमंत जाधव

खामगाव – मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील विदर्भ दौऱ्यावर येत असून त्यांची खामगाव शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर न.प.मैदानावर सोमवार ४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता सभा होणार आहे. भव्य अशा मैदानावर सभेचे नियोजन करण्यात येत असून सकल मराठा समाज बांधव यासाठी झटत आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षा पासुन मागणी होत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा सुरू केल्या पासून त्यांच्या उपोषण, आंदोलनाला मराठा समाज बांधवांकडून मोठा पाठींबा मिळताना दिसून येत आहे. या आंदोलनाला राज्यव्यापी स्वरूप आले आहे.

मनोज जरांगे पाटील हे राज्यभर दौरा करत असून महाराष्ट्रातील अनेक शहरात, गावात त्यांच्या सभा होत आहेत. दरम्यान ४ डिसेंबर रोजी मनोज जरांगे हे विदर्भ दौऱ्यावर येत असून मुक्ताईनगर, मलकापूर, खामगाव व शेगाव असा त्यांचा दौरा राहणार आहे. या पार्श्वभुमीवर ४ डिसेंबर रोजी खामगाव शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर न.प.मैदानावर त्यांची सभा होणार आहे.

यासभेसाठी सकल मराठा समाज बांधव जोरात तयारी करत आहेत. मैदानावर भव्य स्टेज उभारण्यात आले असून स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मुर्ती सर्वांचे आकर्षण ठरणार आहे. तर सभास्थळी महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच विद्युत व्यवस्था, पाणी आदी सुविधांबाबत तयारी करण्यात येत आहे. सभास्थळी गेट क्रमांक १ मधून पुरूष, गेट क्रमांक २ मधून महिला / पत्रकार व पोलिस प्रशासन तर गेट क्रमांक ३ मधून पुरूषांसाठी प्रवेश राहणार आहे. वाहने पार्कींग केल्यानंतर समाजबांधवांनी सभास्थळी पायी यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सात ठिकाणी पार्कींग व्यवस्था
मनोज जरांगे पाटील यांचे सभेसाठी खामगाव सह संपुर्ण जिल्हाभरातून सकल मराठा समाज बांधव एकवटणार असून त्यादृष्टीने वाहनांची पार्कींग व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये राणा लकी सानंदा शाळेजवळ शेगाव रोड, जे.व्ही. मेहता विद्यालय, पोलिस परेड ग्राउंड, जि.प.हायस्कूल मुले व मुलींची शाळा, ओंकारेश्वर मैदानासमोरील मैदान चिखली रोड, कृउबास टिएमसी यार्ड अकोला रोड अशी पार्कींग व्यवस्था करण्यात आली आहे.

मनोज जरांगे यांचा शेगावात मुक्काम
खामगाव येथील सभा आटोपल्यानंतर मनोज जरांगे पाटील शेगावकडे रवाना होणार आहेत. शेगाव येथे पोहचल्यानंतर श्री संत गजानन महाराज यांचे दर्शन घेणार असून शहरात मुक्कामी राहणार आहेत. व दुसऱ्या दिवशी पुढील दौऱ्या करीता रवाना होणार आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: