खामगाव – हेमंत जाधव
खामगाव सकल मराठा समाजाचा आरक्षणासाठी आक्रोष सुरू आहे. परंतु आतापर्यंत मराठा समाजाच्या भरवश्यावर मोठे झालेल्या नेत्यांपैकी कोणीही मदतीला आले नाही. त्यामुळे आता कोणत्याही निवडणुकीत कोणालाही मोठे करण्यासाठी धावपळ करू नका तर आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी करा त्यासाठी सकल मराठा समाज बांधवांनी एकवटण्याची वेळ येऊन ठेपली आहे. तर माझा जीव गेला तरी चालेल परंतु मराठा समाजाला आरक्षण भेटल्याशिवाय माधार घेणार नाही, अशी भिष्मप्रतिज्ञा मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी केली.
शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने काल ४ डिसेंबर २३ रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर न.प. मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन कराप्यात आले होते. काल रात्री ९.३० वाजताच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांचे सभास्थळी आगमन झाले, यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करतांना मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, कोणताही पक्ष किंवा नेता मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा आक्रोश समजुन घेत नसल्याचे लक्षात आले आहे.
सगळेच मराठ्यांना संपवायला निघाले आहेत. त्यामुळे आता मराठ्यांनीच आरक्षणाचा लढा हातात घेऊन सरकारला पळता भुई थोडी केली आहे आरक्षणाच्या मागणीनंतर शासनाने गठीत केलेल्या समित्यांनीसुध्दा वेळकाढुपणाचे धोरण अवलंबविले होते.
परंतु आता हात धुवुन मागे लागल्याने समितीकडूनच पुरावे शोधायला सुरूवात झाली आहे येत्या २४ डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण हे निश्चितच मिळणार आहे जर का आरक्षण मिळाले नाही तर सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सर्व संमतीने पूढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असेही जरांगे पाटील म्हणाले.
मराठा समाजातील तरूणांनी व्यसनापासुन चार हात दूर राहावे असा सल्लाही त्यांनी दिला. मनोज जरांगे पाटील यांचे सभास्थळी येण्यापुर्वी विश्व हिंदू परिषद, वचित बहुजन आघाडी, तानाजी व्यायाम शाळा, श्री गुरुद्वारा सिंघ सभा यांच्यावतीने फुलांची उधळण करून आतिषबाजी करुन स्वागत करण्यात आले तर काही जणांनी जेसीबीने फुलांची उधळण करून त्यांचे भव्य स्वागत केले.