Sunday, December 22, 2024
Homeराज्यमनोज जरांगे पाटील…तब्येत जपा, उपोषण मागे घ्या…- मनसे अध्यक्ष राज ठाकरे...

मनोज जरांगे पाटील…तब्येत जपा, उपोषण मागे घ्या…- मनसे अध्यक्ष राज ठाकरे…

मुंबई – प्रफुल्ल शेवाले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एक ट्वीट करत मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता उपोषण थांबवावे असे आवाहन केलं आहे.

जरांगे पाटलांनी स्वतःची तब्बेत जपा.. उपोषण तात्काळ थांबवा.. स्वतःचा जीव पणाला लावू नका असं विनंती ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरे यांचं नेमकं ट्वीट… “तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करीत आहात त्याच्याशी काही देणे घेणं नाही. अशा खोटारड्या बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणं योग्य वाटत नाही..म्हणून तुमचं उपोषण तात्काळ थांबवावे”.असं राज ठाकरे यांनी आवाहन केलं आहे.

मागील उपोषण काळात राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं होते आणि आता उपोषण तात्काळ थांबविण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केलं.. आहे.

Prafulla Shewale
Prafulla Shewalehttp://mahavoicenews.com
मी, प्रफुल्ल शांताराम शेवाळे, रा. टिटवाळा ता. कल्याण जि. ठाणे, पदवी - विद्युत अभियंता, विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात 20 वर्षे अनुभव. पत्रकारिता गेल्या 7 वर्षापासून करतो, मी महाव्हाईस न्यूज ला गेल्या पाच वर्षापासून परिसरातील बातम्या देण्यासाठी नेहमीच सहकार्य करतो...
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: