Thursday, December 26, 2024
HomeBreaking Newsमाझं एन्काऊंटर करायचं आहे ना!…मनोज जरांगे पाटलांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप...

माझं एन्काऊंटर करायचं आहे ना!…मनोज जरांगे पाटलांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप…

आज जालन्याच्या आंतरवली सराटीत मराठा आरक्षणाचा नेते मनोज जरांगे पाटील याचं आक्रमक रूप बघायला मिळाल. त्यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप करीत प्रेस वार्ता सुरु असताना जरांगे पाटील मुंबईसाठी सागर बंगल्यावर फडणवीसांना आव्हान देण्यासाठी निघाले होते. तर मराठा कार्यकर्त्यांनी जरांगे पाटील यांची समजूत काढताना बराच वेळ गोंधळ उडला होता.

मराठा आंदोलना दरम्यान प्रथमच मनोज जरांगे पाटील यांनी सरळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस कोणाला मोठे होऊ देत नाही. पक्षातील अनेक लोकांना त्यांनी संपवले. महादेव जानकर यांनाही त्यांनी मोठे होऊ दिले नाही. त्यांच्या बामणी कावा माझ्या पुढे चालणार नाही. खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी समोर यावे. कोणाच्या आडून हल्ले करु नये, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला.

मराठ्यांना संपवण्याचा फडणवीस यांचा डाव
देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे मी सलाईन घेणेच बंद केले आहे. नारायण राणे आणि अजय बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मी पायी जाऊन आंदोलन करणार आहे. फडणवीस यांच्यामुळेच सगेसोयऱ्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. त्यांनी सांगितले तर एका मिनिटांत त्यांची अंमलबजावणी होईल.

आपण कोणत्याही पक्षाचे नाहीत
छत्रपती समोर बसून सांगतो मी कुठल्याही पक्षाचा नाही. मी कोणत्याही पक्षाचे काम करत नाही. मी केवळ समाजाचा आहे. समाज माझा देव आहे आणि माझी समाजावर निष्ठा आहे. कुणी तरी मराठ्यांना हरवण्याचे स्वप्न बघत आहे. छगन भुजबळ यांना फडवणीस यांच्यामुळे अजित पवार यांच्याकडे जावे लागले.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: