Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayमनोज बाजपेयी यांच्या आईचे दिल्लीत निधन...

मनोज बाजपेयी यांच्या आईचे दिल्लीत निधन…

बॉलिवूडचा प्रतिभावान अभिनेता मनोज बाजपेयीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. मनोजची आई गीता देवी आता नाही राहिल्या असून त्याच्या मृत्यूची बातमी कळताच बॉलीवूड मध्ये शोककळा पसरली आहे. मनोज यांची आई 80 वर्षांची होती आणि दीर्घ आजारानंतर दिल्लीतील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. अभिनेत्याच्या व्यवस्थापकाने ही माहिती चाहत्यांशी शेअर केली.

मनोज बाजपेयी यांची आई गीता देवी गेल्या 20 दिवसांपासून आजारी होत्या. आज सकाळी साडेआठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मॅक्स पुष्पांजली रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. अभिनेत्याची आई त्याच्यासाठी ताकदीचा आधारस्तंभ होती. हे स्पष्ट करताना त्यांच्या व्यवस्थापकाने लिहिले की, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. वाजपेयींशिवाय गीता देवी यांना आणखी दोन मुले आणि तीन मुली आहेत. मनोज यांचे वडील आरके बाजपेयी यांचा आधीच मृत्यू झाला आहे. ते 83 वर्षांचे होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: