Tuesday, October 15, 2024
Homeराज्यस्व.मनोहरभाई पटेल यांची जयंती व शासकीय मेडिकल कॉलेज भुमिपुजन साठी येत असलेले...

स्व.मनोहरभाई पटेल यांची जयंती व शासकीय मेडिकल कॉलेज भुमिपुजन साठी येत असलेले उपराष्ट्रपती यांच्या दौऱ्यानिमित्त वाहतूक मार्गात परिवर्तन…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

गोंदिया – स्व. मनोहरभाई पटेल यांचे जयंती व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन निमित्ताने उपराष्ट्रपती (भारत सरकार) हे 11 फेब्रुवारी 2024 रोजी गोंदिया जिल्हयाचे दौऱ्यावर येणार आहेत.

कार्यक्रम स्थळी वाहनांची मोठ्या प्रमाणात आवागमन होणार असल्याने खालील मार्गाने जड अवजड वाहनाचे आवागमण पर्यायी मागाने वळविण्यात आल्याची अधिसूचना जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी निर्गमित केली आहे. हा बदल तात्पुरत्या स्वरूपाचा असून नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

उपराष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल व इतर मंत्री महोदय हे बिर्सी विमानतळ येथुन कारने एम. आय. ई. टी. कॉलेज, गोंदिया व डि. बि. सायन्स कॉलेज, गोंदिया येथे स्वर्ण पदक वितरण कार्यक्रम स्थळी येणार असुन रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात आवागमण राहणार असुन जड व अवजड वाहनां पासुन वाहतुकीची कोंडी होवुन गंभीर स्वरूपाचे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

तसेच एखादा मोठा अपघात होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तरी सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांच्या जीवीतास धोका निर्माण होवु नये, याकरीता दि. 11 फेब्रुवारी 2024 रोजी खालील मार्गाने जड अवजड वाहनाचे आवागमण पर्यायी मागाने वळविणे आवश्यक असल्याचे पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्हा प्रशासनाला कळविले आहे.

त्याअनुषंगाने जिल्हयातील खालील मार्गा करीता जड व अवजड वाहनांकरीता ( एस. टी. बस, अग्नीशामक दल वगळून) दि. 11 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 07.00 वा. ते 16.00 वा. पर्यंत तात्पुरती स्वरूपात पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्याचे आदेश जारी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी अधिसूचनेत म्हटले आहे.

खालील मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण होणार नाही या करीता वाहतूक परिवर्तन करण्यात आले आहे.

1) बालाघाट कडुन रावणवाडी मार्गे आमगाव कडे जाणारी जड-अवजड वाहतुक कोरणीघाट-चंगेरा-बनाथर-छिपिया- भद्रुटोला-कटंगटोला-बडेगाव-कामठा-कालीमाटी-आमगाव मार्गे वळविण्यात आली आहे.

2) बालाघाट कडुन गोंदिया ते तिरोडा कडे जाणारी जड-अवजड वाहतुक बालाघाट-खैरलांजी – परसवाडा टी पाईंट- करटी-तिरोडा या पर्यायी मार्गाने वळविली आहे.

3) आमगाव कडून गोंदिया ते तिरोडा कडे जाणारी जड-अवजड वाहतुक पतंगा चौक-कारंजा-गोरेगाव-कुऱ्हाडी बोदलकसा-सुकळी-सुकळीफाटा-तिरोडा या पर्यायी मार्गाने वळविली आहे.

4) तिरोडा कडून गोंदिया ते गोरेगाव कडे जाणारी जड-अवजड वाहतुक तिरोडा-रामाणी लॉन-ढाकणी रोड-चुटीया-डव्वा टी पाईंट-गोरेगाव या पर्यायी मार्गाने वळविली आहे.

उपरोक्त अधिसुचना स्थानिक कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने दि. 11 फेब्रुवारी 2024 रोजीचे सकाळी 07.00 वा. ते 16.00 वा. पर्यंत अंमलात राहील असे अधिसूचनेत म्हटले आहे

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: