प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा रेडिओ कार्यक्रम “मन की बात” चा १०० वा भाग अहेरी विधानसभा क्षेत्रात अनेक ठिकाणी आयोजित…
गडचिरोली – अहेरी येथील माता कन्यका परमेश्वरी मंदिर सभागृहात देशातील १०० वा मन की बात कार्यक्रम माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विशेष उपस्थितीत आज संपन्न झाले, या कार्यक्रमाला अहेरी तालुक्यातील जिमलगटा, उमानुर, देचलीपेठा, कमलापुर, गुड्डीगुडम, पेरमिली, मेडपल्ली, आलापल्ली, नागेपल्ली, महागाव, वांगेपल्ली, देवलमरी या गावातून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते जवळपास ३५० च्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ चा रविवारी सकाळी ११ वाजता १०० वा भाग प्रसारित झाला. या ऐतिहासिक क्षणासाठी अहेरी येथे जय्यत तयारी करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे न्यूयॉर्कस्थित संयुक्त राष्ट्र मुख्यालयासह देश-विदेशात ४ लाख ठिकाणी प्रसारण होते. भाजपाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सरासरी १०० ठिकाणी हे भाषण ऐकण्याची सोय केली होती, अहेरी विधानसभा क्षेत्रातही अहेरी सहित अनेक ठिकाणी हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आले.
काल मन की बातचा १०० व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सर्वांची हजारो पत्रे व संदेश मिळालेत. मी हे पत्र वाचण्याचा सर्वोतपरी प्रयत्न करतो. अनेकदा पत्र वाचताना भावूक होतो. भावनेत वाहून गेलो, पण वेळीच स्वतःला सांभाळले. १०० व्या भागावर, मी मनापासून सांगतो की, तुम्ही अभिनंदन केले आहे, तुम्ही सर्व श्रोते पात्र आहात असे म्हणाले.
पुढे बोलतांना, ‘सेल्फी विथ डॉक्टर’ चा माझ्यावर प्रभाव, जम्मू आणि काश्मीरच्या पेन्सिल स्लेटचा केला उल्लेख, मेक इन इंडियाचे उत्पादन, हीलिंग हिमालय सुरू करणाऱ्या प्रदीप यांच्याशी मोदीजी यांचा संवाद,स्वच्छ सियाचीन, सिंगल यूज प्लॅस्टिक यावर पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी बोलले. संपूर्ण जग पर्यावरणाबाबत चिंतेत आहे.
त्यात मनाची तयारी महत्त्वाची आहे. युनेस्कोचे डीजी (UNESCO) यांनी संवाद साधला. त्यांनी मला ‘ मन की बात’ साठी अभिनंदन केले. भारत आणि युनेस्कोचा इतिहास खूप जुना आहे. युनेस्को शिक्षणावर काम करत आहे. २०३० पर्यंत आम्हाला सर्वत्र दर्जेदार शिक्षण द्यायचे आहे. असे संपूर्ण कार्यक्रमा दरम्यान देशवासीयांना संवाद साधला.
ह्यावेळी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, सदर कार्यक्रम करीता भाजपा अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री तसेच भाजपा पदाधिकरी तसेच कार्यकर्ते यांचा सहकार्य लाभले..!!