Monday, December 23, 2024
Homeराज्यविरोधकांचा अपप्रचार मोडीत काढून आपला बूथ अधिक मजबूत करा...

विरोधकांचा अपप्रचार मोडीत काढून आपला बूथ अधिक मजबूत करा…

भाजपा नेत्यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन…

खामगाव जिल्हा विस्तारित अधिवेशन संपन्न

शेगाव – हेमंत जाधव

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी चुकीचा अपप्रचार करीत अपेक्षेप्रमाणे जास्त जागा जिंकल्या, परंतु आता त्यांचा अपप्रचार मोडीत काढून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचा व आपला बूथ अधिक मजबूत करण्यासाठी आता पासूनच कामाला लागा असे आवाहन भाजपाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

रोकडिया नगर, शेगाव येथील श्री देशमुख मंगल कार्यालयात आज 2 ऑगस्ट रोजी भाजपा खामगाव जिल्हा विस्तारित अधिवेशन (बैठक) पार पडली. त्यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी सदर आवाहन केले. या अधिवेशनाचे अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष मा. आ. चैनसुखजी संचेती होते प्रमुख मार्गदर्शक भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. रणधीरजी सावरकर होते. तसेच माजी मंत्री तथा आ.डॉ.संजयजी कुटे, आ. अँड. आकाश फुंडकर, प्रदेश सचिव जयवंतराव देहनकर, प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, अकोला महानगर अध्यक्ष श्री मसने, प्रदेश सोशल मीडिया सह संयोजक सागरदादा फुंडकर यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचे शुभहस्ते भारतमाता, शामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय व लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांचे प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून वंदेमातरम् आणि महाराष्ट्र गीताने या बैठकीला सुरुवात करण्यात आली. उपस्थित खामगाव जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना विनोद वाघ, जयवंतराव देहनकर, आ.अँड.आकाश फुंडकर, आ.डॉ.संजय कुटे, आ. रणधीर सावरकर, मा.आ. चैनसुख संचेती यांनी अनुक्रमे मार्गदर्शन केले.

एवढी मार्गदर्शन ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीत आपल्याला पाहिजे तसे यश मिळाले नाही. विरोधी पक्षांनी संविधान बदलणार आदी खोट्या गोष्टी जनतेसमोर रेटून मांडल्या. त्यात त्यांना यश मिळाले व आपल्या काही जागा कमी आल्या. काही विशिष्ट समाजाच्या मतदारांना त्यांनी विशेष करून अपप्रचाराने टार्गेट केले व त्यांना आपल्याकडे खेचले. लोकसभेत जे झाले ते आता विधानसभा निवडणुकीत होणार नाही याची आता आपण आतापासूनच दक्षता घेणे गरजेचे आहे.

त्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी मतदारांना त्यांचे घरी जाऊन थेट भेटावे व त्यांना गेल्या दहा वर्षात आपण केलेल्या कामांची माहिती द्यावी. तसेच लाडकी बहीण योजना व इतर महत्त्वकांशी योजना गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावे. आपल्या सरकारने आणलेल्या या जनहीतार्थ योजना आणल्या व त्यांना पटवून सांगा. प्रत्येक समाजातील व्यक्तीला सोबत घेऊन प्रचार व प्रसार करा आणि सर्वांचे समस्यांचे निराधार करा. कोणतेही निवडणूक जिंकण्यासाठी आपण आपला बूथ सक्षम असणे गरजेचे आहे. त्यामुळे आजूबाजूला काय चालले हे न बघता केवळ आपल्या बूथ कडे अधिक लक्ष घालून प्रत्येक बूथ वर आपल्याला चांगला लीड मिळेल यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा.

भाजपा महायुती सरकार हे गोरगरीब शेतकऱ्यांचे आहे हे सर्वांना पटवून द्या. शेतकऱ्यांची वीज माफी आपल्या सरकारने माफ केली. वीज माफी हे केवळ एका वर्षासाठीच नाही तर येणाऱ्या पाच वर्षाची ही वीज माफी देण्यात आली आहे. मोफत वीज देण्यासाठी सुमारे 50000 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. तसेच लाडक्या बहिण योजनेसाठी सुद्धा येणाऱ्या 2025 च्या आर्थिक वर्षापर्यंत चा लागणारा निधी सुद्धा मंजूर केला आहे. विरोधक या योजनेचा अपप्रचार करून केवळ निवडणुकीसाठीच या योजना सरकारने आणल्या, निवडणूक होतात कोणालाही पैसे मिळणार नाही असे ते खोटं व रेटून महाराष्ट्रात सांगत आहेत.

आधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केली असल्याने या योजना बंद होणारच नाहीत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास या योजना बंद होतील हे सर्व मतदारांना आपल्या लाडक्या बहिणींना समजून सांगा. आपल्या सरकारने गेल्या दहा वर्षात विदर्भाचा खूप मोठा अनुशेष भरून काढला आहे. भाजपा महायुतीचे सरकार येणे हे आपल्या काळाची गरज आहे. त्यामुळे विदर्भाचा इतरही राहिलेला सर्वांगीण विकास व अनुशेष भरून काढण्यासाठी आपण विधानसभेच्या निवडणुकीसाठी आतापासूनच तयार लागा. लोकसभा निवडणुकीत आपण जिल्ह्याला दोन खासदार दिले. ते दोघेही मंत्री झाले. हे सर्व तुमच्या मेहनतीमुळे झाले.

त्यामुळे आता खामगाव जिल्ह्यातील खामगाव, जळगाव जामोद व मलकापूर या तिन्ही जिंकण्यासाठी आपला बूथ जिंका.. विधानसभा जिंका याप्रमाणे जोमाने कामाने लागा असे आवाहन याप्रसंगी सर्व मान्यवरांनी केले. तत्पूर्वी या अधिवेशनात खामगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून झालेल्या भाजपा पदाधिकारी व त्यांच्या नातलगांच्या निधनाबद्दल शोक सभा प्रस्ताव भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय भालतीडक यांनी मांडला. एवढी उपस्थित सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

तसेच देशात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व राज्यात महायुती सरकारने केलेल्या चांगल्या कार्यासाठी जयवंतराव देहंकर यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला ज्येष्ठ नेते संतोषराव देशमुख व ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश गव्हाळ यांनी अनुमोदन करून प्रस्तावाला समर्थन केले. तसेच शासनाच्या चांगल्या कार्याबद्दल प्रवक्ते विनोद वाघ यांनी सुद्धा प्रस्ताव मांडला.

या अधिवेशनाचे सूत्रसंचालन भाजपा जिल्हा सरचिटणीस शरदचंद्रजी गायकी, प्रास्ताविक खामगाव जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख तर आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस डॉ गणेश दातिर यांनी केले. या अधिेशनासाठी खामगाव जिल्ह्यातील खामगाव, जळगाव जामोद व मलकापूर मतदारसंघातील भाजपाचे सुमारे 2 हजार प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. अधिवेशनाचा शेवट राष्ट्रगीताने झाला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: