Tuesday, November 5, 2024
Homeराज्यआगामी विविध क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकारी सौरभ...

आगामी विविध क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार…

अमरावती – दुर्वास रोकडे

जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, तसेच विविध एकविध खेळ संघटनेमार्फत तालुका, जिल्हा व विभागस्तर शालेय विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच स्क्वॅश व नेटबॉल या राज्यस्तर क्रीडा स्पर्धेचे आयोजन माहे ऑक्टोबरमध्ये होणार आहे. या सर्व स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.

सन 2024-25 या वर्षातील स्पर्धा आयोजनाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, क्रीडा व युवक सेवाचे उपसंचालक विजय संतान, मनपाचे शिक्षणाधिकारी श्री. मेश्राम, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाचे शोएब शेख, शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रिती देशमुख, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री. सोनोने, जिल्हा माहिती कार्यालयाचे सतिश बगमारे, क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने, आर. बी. वडते आदी उपस्थितीत होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, स्पर्धेचे संघ नोंदणी, खेळाडू नोंदणी, प्रमाणपत्र नोंदणी इत्यादी स्पर्धा आयोजन सुलभ होण्याकरीता ऑनलाईन सॉफ्टवेअरचा लाभ घ्यावा. नविन जिल्हा क्रीडा संकुल येथे धर्नुविद्या, अत्याधुनिक जिम, कुस्ती,ज्युदो, कबड्डी, टेबल-टेनिस, स्क्वॅश या खेळाकरीता आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्यावे. तसेच खेळाडूंकरीता वसतीगृह आदी सुविधा क्रीडा संकुल येथे निर्माण करावे. यासाठी नियोजनबद्ध प्रस्ताव क्रीडा विभागास सादर करावे. तसेच क्रीडा संकुलाचे लोकार्पण सोहळा व नविन कामाचे भुमिपुजन लवकरच होणार आहे. त्याअनुषंगाने सर्व कामे तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश श्री. कटियार यांनी यावेळी दिले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: