Sunday, December 22, 2024
Homeराज्यदेशातील बहुसंख्य पत्रकारिता लाचार - ख्यातनाम पत्रकार निखिल वागळे...

देशातील बहुसंख्य पत्रकारिता लाचार – ख्यातनाम पत्रकार निखिल वागळे…

सांगली – ज्योती मोरे

या देशातील बहुसंख्य पत्रकारिता ही लाचार झाली आहे, पत्रकारांच्या मनामध्ये आग आहे परंतु त्यांना सांगितल्यास ते अशा बातम्या देतील की या बातम्यांमुळे अक्षरशः खळबळ माजेल अशा बातम्या आज समाजात आहेत परंतु त्या दिल्या जात नाहीत याचे कारण म्हणजे या देशातल्या प्रत्येक वृत्तपत्र समूहाला आणि न्यूज चॅनलला कोट्यावधी रुपयांच्या जाहिरातींचा भाजपा आणि मोदी सरकारकडून होतोय त्यामुळे मोदीं विरोधात बोलायचं की नाही इथेच संभ्रम निर्माण होतो.

त्यामुळे फुलवामा प्रकरणाच्या बातम्या म्हणाव्यात इतक्या वृत्तपत्रातून आणि चॅनल्स मधून आल्या नाहीत. असे ठाम मत महाराष्ट्रातील ज्येष्ठ खतनाम पत्रकार निखिल वागळे यांनी सांगली येथे व्यक्त केले आहे.

मराठी पत्रकार परिषदेची संलग्न सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित जिल्ह्यातील पत्रकार पुरस्कार सोहळ्यासह ज्येष्ठ पत्रकार संपादक दशरथ पारेकर यांच्या जीवनगौरव पुरस्कार प्रधान कार्यक्रमास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तेव्हा ते उपस्थितांसमोर बोलत होते.

दरम्यान गुजरात दंगल ही मोदींच्या लोकांनी घडवली या प्रकरणाबाबत सुप्रीम कोर्टासमोर पुरेसे पुरावे गेले नाहीत अथवा सुप्रीम कोर्ट न्यायदेवतेप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून बसले असून, तेही अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत न्याय देत असल्याची घाणाघाती टीका पत्रकार वागळे यांनी यावेळी केली.

पत्रकाराला स्वातंत्र्य पाहिजे. ज्या समाजात स्वातंत्र्य नाही. सरकार ज्यावर दडपण आणतय तिथं मी श्वास घेऊ शकत नाही. आपण जिवंत आहे हे जर सिद्ध करायचे असेल तर आपल्याला मुक्तपणे लिहावे बोलावे आणि व्यक्त व्हावे लागेल.

इंडियन एक्सप्रेस व लोकसत्ता सारख्या वर्तमानपत्रांमध्ये सत्ताधाऱ्यांची बाजू ही पहिली बाजू म्हणून येणार असेल या गोष्टीची लाज वाटते. बहुसंख्य मीडिया हा गोदी मीडिया आहे. अशा गोदी मीडियावर पत्रकारांनी बहिष्कार टाकावा. आणि त्याला पर्याय शोधावा.

दरम्यान काँग्रेसने धर्मनिरपेक्षता ही फक्त निवडणुकीपूरती वापरली असं माझं मत आहे. पण तरीसुद्धा काँग्रेस राजवटीच्या काळात किती परिस्थिती वाईट नव्हती त्यापेक्षा कितीतरी पटीने वाईट परिस्थिती आज मोदींच्या काळात आहे. हे मान्य करावे लागेल. स्टेट चालवणाऱ्या मंत्र्यांना सुद्धा या सत्तेत अधिकार नाही. संसदेमधील चर्चा हा फक्त उपचारच उरलेला आहे त्या ठिकाणी चर्चा होत नाही.

नेहरू पासून आतापर्यंतचे मोदी सोडले तर सर्व पंतप्रधान संसदेमध्ये चर्चा ऐकण्यास बसत होते परंतु मोदी मात्र सभागृहात येतच नाहीत परंतु मीच कसा मोठा हे जेव्हा छातीवरून सांगायचे असते तेव्हाच ते संसदेत येतात अशी जोरदार ती काही पत्रकार वागळे यांनी पुढे बोलताना केली आहे.

आपण माणस आहोत की सरपटणारे प्राणी आहोत असा प्रश्न आज मला पडतो आहे म्हणून मी महाराष्ट्रात काहीही साधन नसताना तुम्ही जागे व्हावे,हे हुकूमशाही सरकार आहे, या सरकारने माध्यमांचे गळे घोटले आहेत. शिवाय यांनी लोकशाहीच्या सर्व स्तंभाना अडचणीत आणलेले आहे. हे सांगण्यासाठी फिरतोय याचा कृपया नागरिकांनी विचार करावा.

मोदी आहे की राहुल गांधी आहेत याचा मला काही फरक पडत नाही या देशाची घटना टिकावी लोकशाही टिकावी एवढाच सामान्य ध्यास आहे. मीडिया दूषित झाला हे सारे पाहता मला घुसमटायला होते म्हणून मी घराबाहेर पडलो असल्याचेही पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटले आहे.

यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर,जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सचिव प्रवीण शिंदे, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत शिरसागर,बलराज पवार, विकास सूर्यवंशी,गणेश कांबळे, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष तानाजी जाधव, कुलदीप देवकुळे, डिजिटल मीडियाचे जिल्हा सचिव मोहन राजमाने,

डिजिटल मीडियाचे सांगली शहर उपाध्यक्ष ज्योती मोरे,सांगली अध्यक्ष सुधाकर पाटील, डिजिटल मीडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजीत शिंदे, महादेव केदार, सलीम नदाफ, सचिन ठाणेकर,अक्रम शेख मोहसीन मुल्ला. आधी पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: