Sunday, December 22, 2024
HomeBreaking Newsजम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात…पहलगामच्या चंदनवाडीमध्ये ITBP बस दरीत कोसळली…सहा जवान शहीद…

जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात…पहलगामच्या चंदनवाडीमध्ये ITBP बस दरीत कोसळली…सहा जवान शहीद…

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. पहलगामच्या चंदनवाडीमध्ये आयटीबीच्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली. या अपघातात सहा जवान शहीद झाले आहेत, तर अनेक जखमी झाले आहेत. बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळी 19 रुग्णवाहिका तैनात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एक बस आयटीबीपीच्या जवानांना चंदनवाडीहून पहलगामला घेऊन जात होती. ब्रेक फेल झाल्याने बस खड्ड्यात पडली. बसमध्ये 39 जवान होते. ३७ जवान आयटीबीपीचे तर दोन जवान जम्मू-काश्मीर पोलिसांचे होते.

सर्व जवान अमरनाथ यात्रेच्या ड्युटीवर होते असे सांगण्यात येत आहे. अमरनाथ यात्रा संपल्यानंतर जवान परतत होते. यादरम्यान ब्रेक फेल झाल्याने बस नदीत पडली. बचावकार्य सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यातील चंदनवाडी पहलगामजवळ झालेल्या एका रस्ते अपघातात आयटीबीपीचे सहा जवान ठार झाले, तर अनेक जण जखमी झाले. ज्यांना श्रीनगरच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: