Monday, December 23, 2024
Homeराजकीयकंत्राटी कामगारांना कायम करा नागपुर हिवाळी अधिवेशनावरील राज्य व्यापी धरणे आंदोलनामध्ये कंत्राटी...

कंत्राटी कामगारांना कायम करा नागपुर हिवाळी अधिवेशनावरील राज्य व्यापी धरणे आंदोलनामध्ये कंत्राटी कामगार असोसिएशनची मागणी…

आंदोलनामध्ये कंत्राटी कामगार असोसिएशन ची मागणी

नरखेड – महावितरण महापारेषण महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबत शासन व तिन्ही कंपनीचे प्रशासन उदासीन असल्याने त्यांचे लक्ष वेधण्याकरीता हिवाळी अधिवेशनावर नागपूर येथील यशवंत स्टेडीयम येथे २२ डिसेंबर गुरुवार रोजी एक दिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले.

कंत्राटी कामगारांना ईतर राज्याप्रमाणे नियमित सेवेत कायम करण्यात यावे.कंत्राटी कामगारांना रोजंदारी पध्दतीने कामावर घेवुन शाश्वत रोजगारांची हमी दयावी.कंत्राटी कामगारांना सरळ सेवा भरतीमध्ये आरक्षण देण्यात यावे,तिन्ही कंपनीतील कंत्राटी कामगारांकरीता कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात यावी,शिकाऊ उमेदवाराना 100 टक्के सरळ सेवा भरती मध्ये आरक्षण देण्यात यावे.

तिन्ही कंपनीतील कंत्राटदार मासिक वेतनामधुन 4000 से 6000 रूपयाची मागणी केली.जाते अशा कंत्राटदारांची चौकशी करून त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात यावे व ईतर प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक वेळा शासन व प्रशासन दरबारी आंदोलने करूनही दखल घेत नसल्याने कंत्राटी कामगारांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.

सदरहु राज्य व्यापी आंदोलन तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे,उपाध्यक्ष बी.आर.पवार,गोपाल गाडगे,सतिश भुजबळ,सरचिटणीस प्रभाकर लहाने उपसरचिटणीस नितिन भैय्या चव्हाण,शिवाजी शिवणेचारी संजय उगले.संघटक महेश हिवराळे,राज्य सचिव आनंद जगताप,रघुनाथ तात्या लाड, कोषाध्यक्ष गजानन अधम, सुनील पाडेकर,तांत्रिक टाईम्सचे संपादक सुनिल सोनवणे,उपसंपादक विवेक बोरकर संस्थापक अध्यक्ष किरण कहाळे,सरचिटणीस प्रकाश वाघ यांच्या मागदर्शनाखाली करण्यात आले.

याप्रसंगी वाषिक अप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्य कार्याध्यक्ष विकी कावळे,उपाध्यक्ष अनिल चव्हाण, सरचिटणीस राहिल शेख, उपसरचिटणीस प्रताप खंदारे,कोपाध्यक्ष अतुल थेर,उपाध्यक्ष दत्तात्रय धायगुडे,अनिवेश देशमुख,कुणाल जिनकार मयुर कोठे,दिनेश काळे,विकी पाचघरे, श्याम भारती,विकास ठुसे,स्वप्निल सोनमकर,गगन सहारे.स्वप्रिल ईटणकर आदी सह शेकडो कंत्राटी कामगार उपस्थित होते.

तांत्रिक कामगार युनियन 5059 प्रणित तांत्रिक अप्रेन्टिस , कंत्राटी कामगार असोसिएशन ने तिन्ही कंपनीमधील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांसाठी विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनावर नागपूर येथील यशवंत स्टेडियम ला राज्य स्तरीय धरणे आंदोलन आयोजित केले होते. या आंदोलनात महाराष्ट्रातून शेकडो कंत्राटी कामगार उपस्थित होते.या आंदोलनाची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या वतीने विधान भवनामध्ये संघटनेच्या पदाधिकारी यांना रात्री आठ वाजता चर्चेसाठी पाचारण करण्यात आले होते.

या चर्चेत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष श्री विक्की कावळे व उपसरचिटणीस प्रताप खंदारे सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री कार्यालय कामकाज मंत्री श्री शंभुराजे देसाई साहेब यांनी संघटना प्रतिनिधींसोबत सविस्तर चर्चा केली व संघटनेचे निवेदन स्वीकारले व त्यातील मुद्द्यावर चर्चा करताना तिन्ही कंपनीमधील भरतीमध्ये कंत्राटी कामगारांना आरक्षण देण्याबाबत तसेच शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: