आंबेडकरी अनुयाया मधील तीव्र संतापाची लाट, ठाणेदार विजय चव्हाण यांच्या सह सहकर्याविरोधत ऍक्ट्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे गावकऱ्यांची मागणी…
पातूर – निशांत गवई
पातूर तालुक्यांतील मौजे पाडुर्णा वासी की ग्राम पंचायत पिंपडोली हद्दी मध्ये ग्राम पंचायत ची ना हरकत घेऊन, गावातून लोकवर्गणी करून पाडुर्णा रोड वर दोन्ही बाजूने खांब गाळून बॅनर ची फ्रेम तयार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेश द्वार तयार केले होते परंतु जातीचा माज असलेले मनुवादी जातीवादी चांन्नी चे ठाणेदार चव्हाण (पाटील) आणि पी एस.आय घुगे यांनी आपल्या सहकार्य सह संगनमत करून पदाचा आणि अधिकाराचा दुरुपयोग करून ग्राम पंचायत ची परवानगी असतांना आणि कोणावाही आक्षेप नसताना या दोघांनी ते प्रवेश द्वार स्वतः खाब हलउन जमिनीवर पाडले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेश द्वाराची विटंबना केली आम्ही गावकरी लोकांनी विरोध केला असता आमच्या कडे उपविभागीय अधिकारी बाळापुर या वरिष्ठांचे आदेश आहेत.
तुम्ही महार लोक माझे काहीही हलके भारी काहीच करू शकत नाही आणि तुमचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार हे अनधिकृत आहे तुम्ही जर विरोध केला तर तुम्हा सर्वाना जेल मध्ये टाकू अशी धमकी दिली व लोकांना तसेच महिलांना अश्लील शिवीगाळ केली असा आरोप स्थानिक नागरिकांननि केला आहे.
तसेच काही वेळातच ज्या वरिष्ठ पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार पाडण्याचे सूचना दिल्या ते पोलीस उपविभागीय अधिकारी सुद्धा हजर झाले आणि आम्हा सर्वांना धमकाऊ लागले नाहरकत असताना सुद्धा यांनी पोलीसांनी तनाशही पध्दतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावांची मुख्य प्रवेश द्वार कमान काढल्या मुळे आज रोजी गावातील नागरिकांनी पोलिस अधीक्षक कार्यालय अकोला येथील भव्य मोर्चा काढला व पोलिस अधीक्षक अकोला यांना तक्रार देउन कार्यवाहीची मागणी केली तसेच पोलिस अधीक्षक यांनी तक्रारीची दखल घेत उपविभागीय अधिकारी गोकुळ राज यानी तात्काळ चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दीले,