नागपूर – शरद नागदेवे
नागपूर :-18 ऑक्टोबर 2024 रोजी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश संघटनात्मक बैठक अशोक हॉटेल
आठरस्ता चौक लक्ष्मीनगर नागपूर येथे आयोजित करण्यात आली.विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा विदर्भ महिला मोर्चा बैठक आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय महिला मोर्चा अध्यक्ष श्रीमती वानाथी श्रीनिवासन यांच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले कि नागपूर ही पावन भूमी असून डॉ. हेडगेवार सारख्या निष्ठावान देशाच्या प्रती भक्ती असणाऱ्या नागपूर शहराला माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी,
उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस लाभलेले असून राष्ट्र, महिला सक्ष्मीकारण तसेच सांस्कृति जपण्यासाठी लढणारे , एकता आणि विशिष्ट हितसंबंधांबद्दल जागरूक करणारी पार्टी म्हणजे भाजपा पार्टी असून प्रत्येक महिला कार्यकर्त्यानी घरो घरी आपले समन्वय वाढवून जास्तीत जास्त संघटन करून महिला मोर्चाची ताकद दाखवून द्यावी.विधानसभा सभा प्रमुख, महाराष्ट्र प्रदेश अधिकारी,जिल्हा अधिकारी विदर्भातून आल्या असून संस्कृती, राष्ट्र जपण्यासाठी आपण सर्वच विजयाच्या दिशेने मेहनत करूआश्वासन महिला कडून घेतले.
तसेच प्रदेशावरून प्रा. वर्षाताई भोसले,सुलक्षणाजी सावंतजी (सहसंयोजक),अश्विनी एमएल (समन्वयक) मायाताई नारोलिया (महाराष्ट्र प्रभारी) अल्का ताई आत्राम यां सर्वांनी मार्गदर्शन केले.मंचावर उपस्थित महिला मोर्चा अध्यक्ष प्रगती ताई पाटील यांच्या महिला संघटनाचे उत्तम प्रदर्शन पाहायला मिळाले शेकडोच्या संख्येने महिला उपस्थित असून भारतीय जनता पार्टीच्या जल्लोषात मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन उपाध्यक्ष,भारतीय जनता पार्टी,
महाराष्ट्र महिला मोर्चा वैशाली चोपडे यांनी केले तसेच नागपूर शहरातील महापौर नंदाताई जिचकार,महिला मोर्चा
महामंत्री मनिषा काशीकर,सारीका नांदूरकर,प्रिति राजदेरकर,निशा भोयर,सुषमा चौधरी,संपर्क मंत्री निकिता पराये,कविता इंगळे,ज्योती ताई देवघरे,वर्षा चौधरी,कविता सरदार,सरिता माने, सोशल मीडिया संयोजिक ज्योत्स्ना कुऱ्हेकर, रुपल दोडके व सर्व विदर्भातून पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष व महामंत्री, संपर्क प्रमुख, मंडळ पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.