Sunday, December 22, 2024
Homeराज्ययशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नागपूर केंद्राच्या जिल्हाध्यक्षपदी महेश बंग…

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नागपूर केंद्राच्या जिल्हाध्यक्षपदी महेश बंग…

नागपूर – शरद नागदेवे

राज्यात विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नागपूर केंद्राचे अध्यक्ष म्हणून युवा सामाजिक कार्यकर्ते महेश बंग यांची केंद्रीय कार्यकारणीने प्रतिष्ठानचे केंद्रीय अध्यक्ष, खासदार शरदचंद्र पवार यांच्या मान्यतेने निवड केली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नागपूर केंद्राच्या झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीत मावळते अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांनी महेश बंग यांच्या नावाची घोषणा केली यावेळी मागील 30 वर्षापासून प्रतिष्ठानची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे डॉ.गिरीश गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे महेश बंग यांना सुपूर्द केली व भविष्यात आपल्या नेतृत्वात प्रतिष्ठान नागपूर जिल्ह्यात अधिक जोमाने व हिरहिरीने सामाजिक कार्य करून सामाजिक दायित्व पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली. तर महेश बंग यांनी सर्वांच्या सहकार्याने प्रतिष्ठानचे कार्य पुढे वृद्धिगत करणार असल्याची ग्वाही दिली.

यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नागपूर केंद्राचे माजी अध्यक्ष डॉ.गिरीश गांधी, डॉ. प्रमोद मुनघाटे, डॉ. कोमल ठाकरे, रेखा दंडीगे-घिया, अरुणा सबाने, डॉ. सागर खादीवाला, डॉ. अभय महाकाळ,लोकनाथ यशवंत, डॉ.प्रदीप विटाळकर,रमेश बोरकुटे, निलेश खांडेकर, रवि देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: