Thursday, September 19, 2024
Homeराज्यसंततधार पावसातही सुरळीत सेवा देण्यासाठी महावितरण कार्यरत...

संततधार पावसातही सुरळीत सेवा देण्यासाठी महावितरण कार्यरत…

अमरावती – दुर्वास रोकडे

मागील पंधरा दिवसांपासून परिमंडळात सुरू असलेल्या संततधार पावसात आलेले अनेक तांत्रिक दोष दुर करत या काळात सुरळीत वीज पुरवठा करून सामान्यांचे जीवन सुकर करण्याचे काम महावितरणकडून करण्यात आले आहे.

वीज ही अत्यावश्यक सेवा आहे.शिवाय विजेवर पाणी,चक्की,तसेच दळण-वळणाच्या अनेक बाबी अवलंबून असल्याने या काळात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांच्या निर्देशानुसार अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात वीज यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

बॅक फिडींग यंत्रणा सज्ज :-

वीज यंत्रणेवर ,वादळ – वारा,मुसळधार पावसाचा परिणाम होतो.महापूरात वीज वाहिनी तसेच वीज खांबही वाहून जाते,वीज वाहिन्या तुटने,पोल पडणे असे अनेक प्रकार घडतात.त्यामुळे अनेक गावे अंधारात जाण्याची शक्यता निर्माण होते. अश्यावेळी महावितरणकडून पर्यायी वीज वाहिन्यांचा वापर करून वीज पुरवठा करण्यात येतो आणि नादुरूस्त वाहिन्यांची त्वरीत देखभाल दुरूस्ती करून त्या कार्यान्वित करण्यात येतात .

तुटलेल्या वाहिनीला/खांबाला हात लावू नये:-

कोणत्याही कारणामुळे एखाद्या ठिकाणी महावितरणचे वीज खांब,वीज वाहिनी  तुटून पडली असेल, तर त्याला कोणीही हात लावू नये.कारण त्यात वीज प्रवाह असण्याची आणि त्यामुळे प्राणांतिक अपघात होण्याची शक्यता असते.अश्यावेळी महावितरणच्या नजिकच्या कार्यालयात किवा अमरावती जिल्ह्यासाठी असलेल्या दैनंदिन सनियंत्रण कक्षाच्या  ७८७५७६३८७३ या नंबरवर आणि यवतमाळ जिल्ह्याकरीता ७८७५७६३०९९ या मोबाईल नंबरवर संपर्क करून माहिती देण्याचे  आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरण यंत्रणा सज्ज :-

वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी सज्ज आहेत.परंतू पाऊस आणि विजेच्या असलेल्या विरोधाभासी संबंधामुळे अनेकदा तांत्रिक दोष निर्माण होऊन वीज पुरवठा खंडित होतो. दोष शोधण्यासाठी बरेचदा संपूर्ण वीज वाहिन्यांचे पेट्रोलिंग करावे लागते. त्यानंतर दोष निवारण्यासाठी थोडा कालावधी लागत असल्याने वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर काही काळ वीज ग्राहकांनी संयम बाळगावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: