Monday, December 23, 2024
Homeराज्यमहावितरण आपल्या दारी उपक्रम, वीज चोरी रोखण्यासाठी मेळाव्यातून दिल्या वीज जोडण्या...

महावितरण आपल्या दारी उपक्रम, वीज चोरी रोखण्यासाठी मेळाव्यातून दिल्या वीज जोडण्या…

अमरावती – शहरातील इमाम नगर वाहिनीवरील वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणच्या शहर विभागाकडून महावितरण आपल्या दारी उपक्रमातून तौकिक नगर,लालखेडी,रिंग रोड भागातील अवैध वीज वापरणाऱ्या नागरीकांना मेळाव्यातून वीज जोडण्या देण्यात आल्या.

शहरातील इमाम नगर,ताज आणि चित्रा वाहिनीवर सरासरी ७० टक्क्यापेक्षा जास्त वीज हानी असल्याने मुख्य कार्यालयाकडून या वाहिनीवरील वीज हानी २० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उध्दीष्ट देण्यात आले आहे.त्यानुसार शहर विभागाकडून या वाहिन्यांवर सतत वीज मीटर तपासण्याची मोहिम घेतली असता,इमाम नगर वाहिनीवर १०८ ग्राहकांनी मीटर मध्ये फेरफार केल्याचे आढळल्याने त्यांच्यावर कलम १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

त्याचबरोबर या वाहीनीवरील तौकिक नगर,लालखेडी,रिंग रोड भागातील सुमारे २०० पेक्षा जास्त नागरीक आकोडे टाकून वीज वापरत होते. अधिकृत वीज जोडणी घेण्यास नकार असतांना कार्यकारी अभियंता आनंद काटकर यांच्या मार्गदर्शनात अतीरिक्त कार्यकारीअभियंता संजय कुटे यांच्या कार्यालयांकडून अवैध वापरवार सतत कारवाई करण्यात आली.

ADS

तसेच अधिकृत वीज जोडणी घेण्याचा पाठपुरावा करत अधिक्षक अभियंता दिलीप खांनदे यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात आला.या मेळाव्यात नागरीकांकडून अधिकृत वीज जोडणीसाठी अर्ज भरून घेत एकाच दिवसात ७० अधिकृत वीज जोडण्या देण्यात आल्या.

यावेळी नियमित वीजबिल भरण्याचे आणि वीज चोरी टाळण्याचे आवाहन अधिक्षक अभियंता यांनी केले.उर्वरीत नागरीकांकडून अर्ज भरून घेऊन त्यांना तत्काळ वीज जोडण्यात देण्यात येणार आहेत.यासाठी लागणारे रोहीत्र व वीज वाहिनीचे कामही तत्काळ सुरू करण्यात आले.या संपूर्ण कामासाठी अतीरिक्त कार्यकारी अभियंता विकास शहाडे व उपकार्यकारी अभियंता राजपाल गेडाम यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: