Monday, December 23, 2024
Homeराज्यसंप काळात सुरळीत वीज पुरवठ्यासाठी महावितरण प्रयत्नशील...

संप काळात सुरळीत वीज पुरवठ्यासाठी महावितरण प्रयत्नशील…

ग्राहकांच्या सहकार्यासाठी नियंत्रण कक्ष

अमरावती दि.०३ जानेवारी २०२३; समांतर वीज वितरण परवान्याला विरोध दर्शवित महावितरणच्या कर्मचारी,अभियंता,अधिकारी कृती समितीव्दारे राज्यव्यापी संपाची घोषणा केली आहे. या संपात अमरावती परिमंडळातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे.त्यामुळे आज दिनांक ३ जानेवारी मध्यरात्रीपासून सुरू होणाऱ्या ७२ तासाच्या संप काळात सुरळीत वीज पुरवठ्याची सर्व खबरदारी घेतली असली तरी,या काळात ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन अमरावती परिमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

वीज कर्मचाऱ्यांच्या संपात महावितरण,महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील एकूण २९ संघटनांचे कर्मचारी,अभियंते व अधिकारी सहभागी आहेत. अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व माहीती देण्यासाठी विभागीय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने महावितरणकडून सर्व काळजी घेण्यात येत आहे,तथापि या कालावधीत वीज पुरवठा खंडित झाल्यास पुर्ववत होण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी संयंम पाळून सहकार्य करावे. संप काळात कर्मचारी,अभियंते व अधिकारी सहभागी झाल्याने ग्राहकांची गैरसोय होऊ नये, त्यांना तक्रार दाखल करता यावीत,तसेच वीज वाहिनी तुटने,शॉर्ट सर्किट होणे आदीबाबत माहीती देण्यासाठी २४ × ७ सह नियंत्रण कक्ष सुरू ठेवण्यात आले आहे.

त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील ग्राहकांनी सह नियंत्रण कक्षाच्या ७८७५७६३८७३ या नंबरवर आणि यवतमाळ जिल्ह्यातील ग्राहकांनी ७८७५७६३०९९ या नंबरवर माहितीसाठी संपर्क साधावा असे आवाहन अमरावती परिमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. रूग्णालये तसेच अत्यावश्यक सेवेतील विभागांनी पर्यायी व्यवस्था ठेवावी;-

संपकाळात वीज पुरवठ्याशी संबंधीत सर्व खबरदारी घेतल्या गेली असली, तरी वीज पुरवठा खंडित झाल्यास तो पुर्ववत होण्यास थोडा कालावधी लागेल या दृष्टिने रूग्णालये किंवा अत्यावश्यक सेवेतील विभागांनी पर्यायी व्यवस्था (उदा.डिझेल जनरेटर,इनव्हर्टर इत्यादी) उपलब्ध ठेवावी असे आवाहन महावितरणने केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: