Monday, December 23, 2024
Homeराज्यकायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना महावितरणचा दिलासा...

कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना महावितरणचा दिलासा…

विलासराव देशमुख अभय योजनेस ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

अमरावती/ मुंबई

वीज बिलांच्या थकबाकीपोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडील वीजपुरवठ्याच्या पुनरुज्जीवनासाठी महावितरणने विलासराव देशमुख अभय योजना ३१ डिसेंबर २०२२ पर्यन्त मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेला मिळालेल्या मुदतवाढीमुळे राज्यातील घरगुती ग्राहकांसोबतच व्यवसाय आणि उद्योगांना पुनरुज्जीवनाची संधी मिळून राज्यातील अर्थकारणाला गती मिळेल.

या योजनेनुसार थकबाकीची मुळ रक्कम हफ्तेवारीने अथवा एकरकमी भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पुर्णतः माफ़ करण्यात येत आहे. योजनेनुसार ३१ डिसेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित केलेले सर्व बिगर कृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहक या योजनेत पात्र होते. योजनेचा कालावधी सहा महिन्यांसाठी (१मार्च २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत) होता. मात्र, अनेक ग्राहकांनी या योजनेला मुदतवाढ देण्याची विनंती करीत वीजबिल थकबाकी भरण्याची तयारी दर्शविल्याने आता या योजनेस डिसेंबर-२०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक आणि पात्र ग्राहकांनी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. एकरकमी थकबाकी भरण्यास इच्छूक असलेल्या ग्राहकांनी उच्चदाबाच्या वीजजोडणीसाठी मुळ थकबाकीच्या ९५ टक्के किंवा लघुदाबाच्या वीज जोडणीसाठी मुळ थकबाकीच्या ९० टक्के आणि सोबतच अर्ज मंजुरीच्या ३० दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर शुल्क भरावे लागेल. हफ्तेवारीने पैसे भरण्यास इच्छूक असलेल्या ग्राहकांना पहिला हफ्ता हा मुळथकबाकीच्या ३० टक्के आणि सोबतच अर्ज मंजुरीच्या ७ दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर शुल्क भरावयाचे असून उर्वरीत रक्कम ठराविक हफ्त्यात महिन्याच्या शेवटी किंवा त्यापूर्वी भरायची आहे.

ज्या ग्राहकांचे अर्ज ३० सप्टेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज मंजूर केले आहेत त्यांनी ३१ऑक्टोबर २०२२पर्यंत थकबाकीच्या ३० टक्क्यांचा पहिला हप्ता किंवा संपुर्ण थकबाकी एकरकमी भरावयाची आहे. हफ्तेवारीचा लाभ घेणारा ग्राहक हफ्ता भरण्यास अपयशी ठरल्यास तो ग्राहक या योजनेतून अपात्र ठरेल आणि त्यास कोणतेही लाभ दिले जाणार नाहीत. थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित केलेले सर्व बिगर कृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहकांनी अधिकाधिक संख्येने या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: