मूर्तिजापूर – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाची मूर्तिजापूर तालुका कार्यकारणी निवड सभा संघटनेचे मार्गदर्शक मा. रामदासजी भोपत यांचे अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी संघटनेचे राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रकाश चतरकर, जिल्हाध्यक्ष सचिन काठोळे, जिल्हा कार्यवाह विजय वाकोडे जिल्हा कार्याध्यक्ष धर्मैंद्रसिंह चव्हाण, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रूपेश सुर्यवंशी मुर्तिजापूर तालूका समन्वयक श्री. अतुल गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला तालूक्यातील सर्व क्रियाशील सभासदांच्या संमतीने मान. जिल्हाध्यक्षांचे परवानगीने निवड समितीचे प्रभारी तथा जिल्हा कार्याध्यक्ष श्री धर्मैंद्रसिंह चव्हाण यांनी तालुका कार्यकारिणीची घोषणा केली त्याला सर्वांनी एकमताने मान्यता दिली यावेळी नूतन तालुका अध्यक्ष ,कार्यवाह यांचे सह संपूर्ण पदाधिकाऱ्यांचे स्वागत कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. रामदासजी भोपत यांनी केले तसेच शुभेच्छा सुद्धा दिल्या व मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बोलतांना शिक्षक परिषद ही नुसती संघटना नसून एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी असलेला एकत्रित असा परिवार आहे व एकतेमध्ये जी ताकद असते ती जगात कुठे कुठल्याही व्यक्तीमध्ये असू शकत नाही संघटनेमुळे आपणास अनन्य साधारण मदत मिळत असते ती विसरता कामा नये. संघटनेच्या बळावर कोणतेही असाधारण काम आपण साध्य करू शकतो त्यामुळे नूतन कार्यकारिणीने अधिकाधिक कार्य करून आपली विचारधारा जास्तीत जास्त सभासदांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी प्रकाश चतरकर यांनी संघटनेच्या वाटचालीवर प्रकाशझोत टाकला तसेच सचिन काठोळे, विजय वाकोडे, रूपेश सुर्यवंशी यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. नूतन अध्यक्ष श्री. अमोल कावरे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देतांना संघटनेच्या मार्गदर्शक मंडळी व सभासदांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा विश्वास व्यक्त केला.
संघटनेचे कार्यवाह श्री. अमित सुरपाटने यांनी निवडीबद्दल संपूर्ण कार्यकारणीचे वतीने सर्वांचे आभार मानले. सभेचे बहारदार संचालन श्री. अभिजित देशमुख यांनी केले सभेला तालूक्यातील सर्व जिल्हा कार्यकारणी सदस्य, तालुका कार्यकारणी सभासदांची उपस्थिती होती.