रामटेक – राजु कापसे
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती प्रगत कुशल (प्रकल्पग्रस्त) प्रशिक्षणार्थी आपल्या संबंधित मागण्या घेऊन कोराडी येथे आमरण उपोषणाला बसलेले असून विद्युत निर्मिती प्रकल्पात ज्यांची शेती गेली त्यांना गेल्या 15 वर्षापासुन प्रशिक्षणार्थी म्हणुन काम करावे लागत आहे.त्यांना अद्यापही नियमित केल्या गेले नसून त्यांची नियमित करून घेण्याची मागणी आहे.
व पुढील येणारी जाहिरात प्रकल्प ग्रस्त प्रशिक्षणार्थ्यांना जो पर्यंत सामावून घेतल्या जाणार नाही तो पर्यंत जाहिरात कुठलीही जाहिरात काढू नये. अशा संबंधित मागण्याविषयी आमरण उपोषण सुरु आहे. या संबंधित दिनांक 28/01/024 रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे रामटेक विधानसभा प्रमुख श्री.विशाल बरबटे यांनी प्रशिक्षणार्थ्यांची सर्व बाजू,अळचणी व मागण्या समजून घेतल्या.
सुमारे 200 प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी या उपोषणाला बसलेले असून यातील बहुतांश प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी हे रामटेक विधानसभा क्षेत्रातील असून यातून लवकरच मार्ग काढून महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती प्रकल्पाला संबंधित विषयावर चर्चा करू.आपल्या मागण्या पूर्ण करून घेऊ असे उपोषण कर्त्याला आश्वासित केले. याप्रसंगी पक्षाचे सहकारी विधानसभा संघटक श्री.रमेश तांदुळकर,पारशिवनी उपतालुका प्रमुख श्री.सुनील सहारे उपस्थित होते.