नागपूर – शरद नागदेवे
नागपूर महाराष्ट्र वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना, महारष्ट्र राज्य, नागपूर तथा महाराष्ट्र राज्य वनमजूर व वन कर्मचारी संघटना नागपूर द्वारे आयोजित 08 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 12 मार्च 2023 रोजी शिबिर कार्यालय, वन वाटिका विश्राम गृह, सेमिनरी हिल्स, नागपूर येथे मा. श्री. अजय भाऊ पाटील, केंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्र वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना, महारष्ट्र राज्य, नागपूर यांचे मार्गदर्शनात जागतिक महिला दीन साजरा करण्यात आला.
महिलांचे सक्षमीकरण व बळकटीकरण करणे तसेच वन विभागात पुरुषांसोबत खांद्याला खांदा लाऊन काम करताना येणाऱ्या अडी अडचणी सोडविणे यासंबंधी शंका व अडचणींचे निराकरण करण्यासाठी आज सौ प्रगती ताई पाटील यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात क्षेत्रीय महिला अधिकारी व कर्मचारी तसेच कार्यालयीन महिला कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रमात नृत्य, नाटक, गाणे सादर करून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ प्रगती पाटील यांनी महिलांसाठी असे कार्यक्रम वारंवार होणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्रसंगी सामाजिक वनीकरण विभागीय वनाधिकारी श्रीमती गीता नन्नावरे तसेच विभागीय वनाधिकारी श्रीमती दिपाली तलमले यांनी मार्गदर्शन केले, नोकरदार महिलांना त्यांच्या आयुष्यात दुहेरी भूमिका साकारावि लागते. घर परिवारासोबतच आपली नोकरी करणे यामध्ये तिचा संपूर्ण कस लागतो.
आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना तिचे स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होते त्यामुळे आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून काही वेळ आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे सुद्धा गरजेचे असल्याचे त्यांनी सनगितले. तसेच दुर्गम अती दुर्गम क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे तसेच तालुका स्तरावर वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचे सन्मानार्थ मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच वनरक्षक या पदावरून वनपाल पदावर नुकतेच पदोन्नती झालेले महिला वनकर्मचारी राणी बहादुरे, राणी महल्ले, शारदा मेश्राम, स्वाती शिंदे, लता मांढळकर, यांना मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला. वर्धा वन विभागाची संघटनेची विभागीय अध्यक्ष श्रीमती सुनीता लटपटे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सर्व महिला कर्मचारी यांनी आम्ही शेवटपर्यंत कर्तव्य निष्ट राहून आमचे कर्तव्य पार पाडू, तसेच यथाशक्ती संघटनेच्या कार्यात संघटनेला मदत करू असे सांगितले.
प्रसंगी कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती श्रीमती दिपाली तलमले, श्रीमती गीता नन्नावरे तसेच श्रीमती सारिका वैरागडे, व.प.अ. सेमिनरी हिल्स,नागपूर श्रीमती रीना राठोड, व.प.अ. हिंगणा ( प्रा.) श्रीमती अर्चना नवकरकर व.प.अ कळमेश्वर ( प्रा.) श्रीमती कोमल गजरे व.प.अ दक्षिण उमरेड ( प्रा.) श्रीमती शालिनी शिरपुरकर व.प.अ पारशिवणी ( प्रा.) श्रीमती शितल करणासे व.प.अ कळमेश्वर ( सा. व. वि.), श्रीमती निलिमा डकरे व.प.अ पारशिवणी ,
श्रीमती प्रतिभा रामटेके, व.प.अ. टी. टी.सी. नागपूर. श्रीमती छबूकांता भडांगे व.प. अ. भंडारा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना कार्यक्रमात सहभगाबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती ममता भोसले यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्रीमती ललिता वरघट यांनी केले.