Saturday, December 21, 2024
HomeBreaking NewsMaharashtra Cabinet | महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार…उद्या नागपुरात शपथविधी…

Maharashtra Cabinet | महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार…उद्या नागपुरात शपथविधी…

Maharashtra Cabinet : महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी मुंबईऐवजी नागपुरातील राजभवनात होणार आहे. नागपुरात मंत्र्यांच्या शपथविधीची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. त्यापूर्वी शपथविधीची प्रक्रिया पूर्ण होईल.

यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच माहिती दिली जाईल, असे सांगितले. त्याचवेळी भाजप नेते गिरीश महाजन यांना पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व, आमचे अध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाजन यांना मंत्रिपदाची शपथ घ्यायची असल्याचा संदेश मिळाला असल्याचे सांगण्यात आले आहे. तर कालपासून मुंबईसह नागपूरमध्ये वेगवान घडामोडी घडल्या. रात्रभर लॉबिंग सुरू होते. या जम्बो मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात येत आहे. तर काही जुन्या नेत्यांना पण संधी देण्यात येणार आहे. तर काहींना डच्चू देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारात तिघांच्या नावाचा पत्ता कट होणार असल्याचे समोर आले आहे.

दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांना डच्चू देण्यात आल्याचे समोर आले आहे. तर आता अजित पवार गटाच्या शिलेदारांच्या यादीत अद्याप धनंजय मुंडे यांचे नाव समोर आले नाही तर दुसरीकडे भाजपाच्या यादीत रविंद्र चव्हाण यांना स्थान देण्यात आले नसल्याचे दिसते.

दरम्यान, मंत्रिपरिषदेच्या विस्तारात भाजप गृहनिर्माण मंत्रालय शिवसेनेकडे सोपवण्याची शक्यता आहे. गृहमंत्रालय भाजपकडेच राहील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या दोन्ही मित्रपक्षांना पूर्वीच्या महायुती सरकारमध्ये जे खाते होते तेच खाते मिळू शकते. मात्र, शिवसेनेला अतिरिक्त मंत्रिपद दिले जाऊ शकते.

महायुतीतील इतर पक्षांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री शिंदे हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत, त्यामुळे भाजप त्यांच्या पक्षाला आणखी एक महत्त्वाचे मंत्रिपद देऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. पवारांना एकदाच अर्थमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिवसेनेचे आमदार योगेश रामदास कदम हे शिवसेनेतील सर्वात तरुण आमदार म्हणून असल्याने त्यांना मला संधी मिळणार असल्याचे बोलले जाते.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: