Sunday, December 22, 2024
Homeशिक्षणMaharashtra Board 10th Result | दहावीचा निकाल जाहीर...हा विभाग ठरला अव्वल...येथे चेक...

Maharashtra Board 10th Result | दहावीचा निकाल जाहीर…हा विभाग ठरला अव्वल…येथे चेक करा निकाल…

Maharashtra Board 10th Result : मागील आठवड्यात १२ विचा निकाल जाहीर झाला होता, या मधेही मुलींनी बाजी मारली तर आज दहावीचा निकाल जाहीर झाला असून या 10 वीच्या निकालात मुलींनी बाजी मारली. विशेष म्हणजे यंदा दहावीच्या निकालाच्या टक्केवारीमध्ये वाढ झालीये. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी नुकताच दहावीचा निकाल जाहीर केलाय. विभागीय टक्केवारी देखील जाहीर करण्यात आलीये. यावेळी दहावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल ठरलाय. नागपूर विभागाचा निकाल सर्वाधिक कमी लागलाय.

विशेष म्हणजे बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालात देखील मुलींनीच बाजी मारलीये. मुलींच्या टक्क्यात मोठी वाढ झालीये. मुलांपेक्षा दहावीच्या निकालात मुलीच वरचढ ठरल्या आहेत. राज्याची दहावीच्या निकालाची टक्केवारी 95. 81 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाचा टक्का वाढला आहे.

आत्ताच व्हाट्सअप वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट, आपल्या परिसरातील घडामोडी व महत्त्वपूर्ण माहिती त्यासाठी जॉईन करा. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीच्या निकालाबद्दल सविस्तर माहिती दिलीये. मुलींचा निकाल 97.21 टक्के लागलाय. मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा 2.65 टक्के ने अधिक आहे. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 99 टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा निकाल 94.73 टक्के आहे.

विभागनिहाय निकाल

पुणे – 96.44, नागपुर – 94.73, संभाजीनगर – 95.19, मुंबई – 95.83, कोल्हापूर – 97.45, अमरावती – 95.58, नाशिक – 95.28, लातूर – 95.27, कोकण – 99.01 याप्रमाणे विभागीय निकाल लागलाय. यामध्ये कोकण विभाग अव्वल ठरला असून सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागलाय. विशेष म्हणजे कोकण विभागात अशी एकही शाळा नाही, जिचा निकाल झिरो टक्के आहे.

अधिकृत संकेत स्थळ खालील प्रमाणे

१. https://mahresult.nic.in
२. http://sscresult.mkcl.org
३. https://sscresult.mahahsscboard.in
४. https://results.digilocker.gov.in
५. https://results.targetpublications.org

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: