Sunday, July 21, 2024
spot_img
Homeराजकीयमहाराष्ट्र बारावी बोर्डाच्या परीक्षेला प्रारंभ…१०९५ विद्यार्थ्यांनी केंद्र क्रमांक ४२२ वर दिला पहिला...

महाराष्ट्र बारावी बोर्डाच्या परीक्षेला प्रारंभ…१०९५ विद्यार्थ्यांनी केंद्र क्रमांक ४२२ वर दिला पहिला पेपर…

गोकुळ शिरगाव

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्डाच्या परीक्षेला बुधवार दिनांक 21 रोजी प्रारंभ झाला असून परीक्षेतील पहिला पेपर इंग्रजी विषयाचा पार पडला. कोल्हापूर विभागीय मंडळ मार्फत येणाऱ्या परीक्षा केंद्र क्रमांक 422 गोपाळ कृष्ण गोखले शिक्षण प्रसारक मंडळ या केंद्रात 1095 विद्यार्थी परीक्षेला बसले असून यामध्ये सामान्य विद्यार्थी 1050,अपंग विद्यार्थी -20 अंध विद्यार्थी-20 आणि तात्काळ विद्यार्थी-05 अशी संख्या संख्या असल्याची माहिती गोपाळराव कृष्ण गोखले काॅलेज केद्राराचे केंद्र प्रमुख प्रा.एस.जी पाटील यांनी दिली.

परीक्षेला सुरुवात होण्याआधी प्रत्येक विद्यार्थ्याचे ओळखपत्र तपासून महाविद्यालयात प्रवेश देण्यात येत होता. या परीक्षेला कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी व्यवस्थापनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले होते. अनेक विद्यार्थ्यांना आपले परीक्षा केंद्र कोणती आहे याची माहिती नसणाऱ्या विद्यार्थ्यांना येथील प्राध्यापकांनी योग्य मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: