Saturday, November 23, 2024
Homeराज्यमहामानव भागोजीशेठ कीर स्मृती समिती...

महामानव भागोजीशेठ कीर स्मृती समिती…

गणेश तळेकर

महामानव भागोजीशेठ कीर यांच्या जयंती निमित्त तथा पुण्यतिथी सोहळा निमित्त “पदयात्रा” तिथीनुसार महाशिवरात्री दिनी दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता बेंगाल केमिकल भवन, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी ते भागोजीशेठ हिंदू स्मशानभूमी, दादर चौपाटी पर्यंत आयोजित करण्यात आलेली होती, त्याठिकाणी जाहिर सभा घेण्यात आली होती.
तरी आपण सर्वानी या कार्यक्रमात सहभागी होऊन उदंड असा प्रतिसाद दिला त्या बद्दल आपले सर्वांचे महामानव भागोजी कीर स्मृती समिती तर्फे आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.

जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला ! अशी प्रचलित म्हण आहे. देवाने या भूतलावर भागोजी बाळाजी कीर नामक दान ह्या देशाच्या पदरी घातलं. एखाद्या व्यक्तीला महाशिवरात्री या दिवशी जन्म व मुत्यु एकाच दिवशी दिला असता का ?

भागोजीशेठ कीर हे महामानव असल्याचे प्रत्यक्ष पुरावे दृश्य स्वरुपात आजही अस्तित्वात आहेत.
त्यांच्या निस्वार्थ कार्याचा तपशील त्यांच्या खालील परिचयात दिसून येईल.

महामानव भागोजीशेठ कीर ह्यांच्या अल्प परिचय

  • गरीब घराण्यात ४ मार्च १८६७ रोजी रत्नदुर्ग किल्ला, जिल्हा रत्नागिरी येथे जन्म झाला.
  • एक छोटा मुलगा ध्येय उराशी बाळगून मुंबईत आला.
  • जुजबी शिक्षणामुळे वयाच्या १२ व्या वर्षापासून सुतारकामाला सुरवात केली. मेहनत, जिद्द व प्रमाणिकपणा या अंगीभूत असलेल्या गुणांमुळे त्यांना मे.शापूरजी पालनजी या कंपनीचे एक भागीदार पालनजी यांनी स्नेहाकिंत भागीदार केले. त्या संधीचे त्यांनी सोने केल. महामानव भागोजींनी मुंबईतील लायन्स गार्डन, सेंट्रल बँक बिल्डिंग, ब्रेबाॕन स्टेडियम, इंडियन मर्चंट चेंबर्स, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक, स्टेट बँक इमारत,मरीन ड्राईव्हची समुद्र रोखणारी तटरक्षक भिंत अशी अभेद्य व्यावसायिक कामे केली आहेत. सचोटीच्या व्यवहाराने कामे केल्यामुळे आजही ती बांधकामे डौलाने उभी आहेत. मुंबईच्या जडण-घडणीत महामानव भागोजींचा मोलाचा वाटा आहे.
  • जाती-धर्मभेद संपवून स्वातंत्र्य लढ्यासाठी एकोपा निर्माण व्हावा या उदात्त हेतूने प्रेरित होऊन सन १९३१ साली स्वातंत्र्यपूर्व काळात विखुरलेल्या समाजवर्गासाठी सहभोजन या उपक्रमाद्वारे स्वातंत्र्य चळवळीस बळ देणारे महान कार्य केले.
  • जाती-धर्मभेद संपविण्यासाठी स्वातंत्र्यवीरांच्या संकल्पनेतील भारतातील पहिले आणि शेवटचे पतितांसाठी पतित- पावन मंदिर रत्नागिरीत बांधले. तेथे अस्पृशांसह सर्व वंचित बहुजन समाजाला दिनांक २२ फेब्रुवारी १९३१ रोजी प्रवेश करुन दिला.
  • स्वातंत्र्यवीरांच्या विचारधारेशी निगडीत पतित पावन मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जन्माने शुद्र अशा व्यक्तीच्या हस्ते करविली.
  • संत गाडगे महाराजांच्या सांगण्यावरुन आळंदी येथे गोरगरीबांसाठी धर्मशाळा बांधून गरजूंसाठी अन्नछत्र सुरु केले.
  • मुंबईसह, पुणे, आळंदी, रत्नागिरी व अन्य ठिकाणी देवळे, धर्मशाळा व स्मशानभूमी बांधून दिल्या.
  • गुजरात व अलिबाग येथे दुष्काळ पडला असता त्यांनी तेथे पाणवठे खोदून दिले.
  • रत्नागिरी येथे अनाथ मुलांसाठी बालकाश्रम बांधून दिले.
  • वाई, सातारा येथे भागेश्वर नावाने गोशाळा बांधली.
  • रत्नागिरी येथे महिलांसाठी भागेश्वर ज्ञानमंदिर विद्यालय बांधून दिले.
  • भागेश्वर ट्रस्ट स्थापन करुन संपत्तीतील जास्तीचा वाटा त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांच्या कल्याणासाठी दान केला.
  • सन १९३० पूर्वी दादर व आसपासच्या परिसरात हिंदू स्मशानभूमी नसल्यामुळे मृतदेह उघड्यावरच जाळावे लागत होते. त्यामुळे ऊन पावसात मृतदेह जाळण्यास अनंत अडचणी येत असत. मुंबईतील दादर सारख्या सुसंस्कृत परिसरात हिंदूसाठी स्मशानभूमी नाही हे त्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी तेथील ९ एकर जागा खरेदी करुन एका भूखंडावर स्वखर्चाने स्मशानभूमी बांधून दिली.

तसेच संपूर्ण जमीनही प्रशासनाकडे हस्तांतरित केली. सध्या त्या ९ एकर जागेत आजघडीला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी स्मारक, स्वा. सावरकर स्मारक, महापौर बंगला/ हिंदूहृदय सम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, महात्मा गांधी जलतरण तलाव, दादर चौपाटी डेकची मार्गिका, प्रमुखस्वामी प्रवेशद्वार इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.

दुर्देव्याची गोष्ट म्हणजे या दानशूर महामानवाचा अर्धपुतळा ९० फुटाच्या लहानशा जागेत मुंबई महानगर पालिकेने स्थापित केला आहे. या बद्दल ना कोणाला खेद ना खंत.
अशी परिस्थिती जर देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महामानवाच्या वाट्याला येत असेल, तर यासारखी गोष्ट नाही.

  • एकदंरीत पाहता १९३० पासून महामानव भागोजीशेठ कीर हिंदू स्मशानभूमीत मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे तसेच नवी मुंबई येथील मृत व्यक्तींचे नातेवाईक व मित्रमंडळी अंत्यसंस्कार करण्यासाठी तसेच दशक्रिया विधीसाठी येत असतात. स्मशानभूमीत येणारे नागरिक दुःखात असल्याने महामानव भागोजींनी केलेले महान कार्य त्यांच्या निदर्शनास येत नाही.
  • देशास स्वातंत्र्य मिळाले, देशाने लोकशाही मार्ग अवलंबिला, देशाच्या संविधानने आपणांस अमर्याद हक्क दिले परंतु स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी लढणा-या तसेच सामाजिक भान ठेऊन आर्थिक योगदान देणारी ही महान विभूती काळाच्या पडद्याआड गेली आहे. त्यांनी केलेल्या महान कार्याचे अस्तित्व आजही दृश्य स्वरुपात दिसत आहे.
  • त्यांनी केलेल्या कार्याचे आपण उतराई होणे कठीणच, तरीही आपण वर्षातील एक दिवस का होईना त्यांच्या जयंती तथा पुण्यतिथी निमित्त निघणाऱ्या पदयात्रेत सहभागी होऊन ह्या देशप्रेमी महामानवास मानवंदना देण्यासाठी आपण आपल्या आप्तस्वकीय व मित्रमंडळीसह आवर्जून उपस्थित रहावे अशी आर्त साद महामानव भागोजीशेठ कीर स्मृती समिती घालीत आहे.

महामानव श्री भागोजी कीर स्मृती समिती चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने हजर होते त्याच बरोबर कार्यक्रमाला मोठ मोठ्या मान्यवर यांनी हजेरी लावली त्यात – खासदार श्री दिपक केसरकर साहेब ( शिक्षणमंत्री ) , ब खासदार श्री राहुल शेवाळे साहेब, श्री अंकुर कीर साहेब ,श्री समर्थ सद्गुरू अविनाश महाराज ,श्री नाविनचंद्र बांदिवडेकर साहेब,स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान कोषाधक्ष्या मंजिरी मराठे मॅडम,

श्रीकृष्ण कंगुटकर साहेब , भारत शेट्ये साहेब , किशोर केळस्कर साहेब , मनसे नेते प्रवक्ते श्री संदीप देशपांडे साहेब , श्री विनोद चव्हाण साहेब , डॉ.अलका नाईक मॅडम , श्री सुधीर नावर साहेब ,श्री शेखर कीर , श्री राजीव कीर , श्री सुधाकर पाटील , श्री पप्पा पाटकर , रिटा मिठगावकर मॅडम , श्री पप्पी पाटील , श्री गजानन मांजरेकर साहेब ( भागोजी किर गेटअप , वेशभूषा ), श्री जगदीश आडीवरेकर ( समन्वक ) हे सर्वजण उपस्थित होते त्यांचे ही खूप खूप आभार…

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: