Friday, November 22, 2024
Homeराज्यमहावितरण कृषी धोरण, ३१ मार्च पर्यंतच घेता येणार ३० टक्के माफीचा लाभ...

महावितरण कृषी धोरण, ३१ मार्च पर्यंतच घेता येणार ३० टक्के माफीचा लाभ…

अमरावती – कृषी पंपाच्या थकीत वीज बिलावरील व्याज,विलंब आकारात माफी.तसेच मुळ थकबाकीतही ३० टक्के माफीचा लाभ येत्या ३१ मार्च पर्यंतच घेता येणार आहे.एप्रिल नंतर माफीची रक्कम कमी होऊन ती २० टक्के होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदत संपण्याची वाट न पाहता कृषी धोरणात सहभागी होऊन आपल्या कृषिपंपाची थकबाकी तसेच चालू बिल भरून थकबाकीमुक्त होण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे.

कृषिपंपाचे वीजबिल आज भरू, उद्या भरू असे म्हणत महावितरणच्या कृषी वीज धोरणातील पहिल्या टप्प्यामधील मुळ थकबाकीत ५० टक्के सवलतीच्या लाभाला परिमंडळातील सुमारे २ लाख ४५ हजार शेतकरी मुकले होते. ३१ मार्च २०२२ पर्यंत पहिल्या टप्प्याची मुदत असलेल्या कृषी धोरणात परिमंडळातील केवळ १३०५० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत व्याज विलंब आकारात संपूर्ण माफीसह वीजबिलाच्या मुळ थकबाकीत ५० टक्के सवलत घेत ते थकबाकीमुक्त झाले आहेत.

कृषी धोरणानुसार ज्या गावात वसुली, त्याच गावात वीज यंत्रणा विकासाचे काम असा निकष ठेवल्याने थकबाकीदार शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेतून त्या गावाकरीता वीजेच्या भक्कम पायाभूत सुविधा निर्माण करणे शक्य होते. कृषी वीज धोरण शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी शेतीच्या बांधापर्यंत, गावच्या पारावर मेळावे घेतले गेले. धोरण पोहोचले असले तरी ‘बिल आज भरू, उद्या भरू’च्या मानसिकतेमुळे एक वर्ष निघून गेले असून, आता दुसऱ्या वर्षाचे फक्त दोन महिने उरले आहेत.

अमरावती परिमंडलात धोरणापूर्वी शेतीची थकबाकी २ हजार ७५९ कोटींच्या घरात होती. दंड-व्याजातील सूट, निर्लेखन व बिल दुरुस्ती समायोजनातून १०७६ कोटी २१ लाख माफ झाले आहेत. त्यामुळे सुधारित थकबाकी ही १६८२ कोटी झाली आहे. कृषी धोरणाच्या दुसऱ्या टप्प्यानुसार सुधारीत म्हणजे मुळ थकबाकीत ३० टक्के थकबाकी माफ होत असल्याने शेतकऱ्यांना ३० टक्के हिश्श्यापोटी ११७७ कोटी अधिक सप्टेंबर २०२० पासूनची चालू बिले भरायची आहेत.

जनसंपर्क अधिकारी
महावितरण,अमरावती परिमंडळ

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: