नांदेड – महेंद्र गायकवाड
मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोही पिंपळगाव येथील एका सहा वर्षीय बालिकेचे अपहरण दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी झाल्याची माहिती मिळाले वरुन पो.स्टे. मुदखेड गुरनं 02/2024 कलम 363 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
नमुद गुन्हयात दिनांक 19/01/2024 रोजी आरोपी दशरथ ऊर्फ धोंडीबा फुलाजी पांचाळ वय-23 वर्ष, व्यवसाय मजुरी/सुतारकी रा. रोहिपिंपळगाव ता.मुदखेड जि.नांदेड अटक करण्यात आली असुन सध्या आरोपी पोलीस कोठडी मध्ये आहे. गुन्हयाचे तपासात आरोपीने त्याचे सोबत गुन्हा करतांना माधव शिंदे हा होता. आम्ही दोघांनी मिळून सदरचा गुन्हा केल्याचे सांगीतले. तसेच गुन्हाचे तपासात सदरचा गुन्हा हा दोन आरोपीतांनी मिळुन केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी माधव शिंदे याचा शोध घेत असतांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन आरोपी माधव ऊर्फ मल्या दिलीप शिंदे वय 24 वर्ष रा. रोही पिंपळगाव ता. मुदखेड जि. नांदेड हा मिळुन आल्याने त्याचे कडे तपास केला असता त्याचा गुन्हात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले व त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली म्हणुन त्यास दिनांक 21जानेवारी 2024 रोजी अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपीतांनी संगणमत करुन गुन्हा केला आहे.
नमुद गुन्हायाचा तपास विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक खंडेराय धरणे यांचे मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोनि उदय खंडेराय, वसंत सप्रे, सपोनि चंद्रकांत पवार, पांडुरंग माने, कमल शिंदे, बाबासाहेब कांबळे, पोउपनि दत्तात्रय काळे, सचिन सोनवणे, अशिष बोराटे, गजानन दळवी, यांनी आरोपी अटक करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. नमुद गुन्ह्याचा तपास उप विभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक हे करत आहेत. वरिल सर्व अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अभिनंदन केले आहे.