Tuesday, November 5, 2024
Homeराजकीय‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात दादांवर गभीर आरोप...जाणून घ्या...

‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात दादांवर गभीर आरोप…जाणून घ्या…

न्यूज डेस्क : पुण्याचे माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर याचं पुस्तक ‘मॅडम कमिशनर’ यामध्ये पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 2010 मधील पुणे येथील येरवडा भागात असलेल्या पोलिसांच्या तीन एकर जमिनीचे हे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाचा उल्लेख त्यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातून केला आहे. या पुस्तकात मीरा बोरवणकर यांनी सरळ अजित पवार यांचे नाव घेतले नाही. परंतु पुण्याचे पालकमंत्री ‘दादा’ असे म्हटले आहे. हे पुस्तक रविवारपासून बाजारात येत आहे.

काय केला आहे अजित पवार यांच्यावर आरोप
‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात मीरा बोरवणकर यांनी म्हटले आहे की, “विभागीय कार्यालयातच मी पालकमंत्र्यांची भेट घेतली. पालकमंत्र्यांकडे येरवडा पोलीस स्टेशन परिसराचा नकाशा होता. त्यांनी मला सांगितलं की, या जागेचा लिलाव झालेला आहे. जास्त बोली लावणाऱ्यासोबत मी (मीरा बोरवणकर) जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी.”

येरवडा येथील तीन एकर जमीन पालकमंत्र्यांनी एका खासगी बिल्डरवर दिली. पुस्तकात त्यांनी थेट अजित पवार यांचे घेतलेले नाही. परंतु जिल्ह्याचे मंत्री ‘दादा’ असे म्हटले आहे. दरम्यान अजित पवार यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. लिलावाच्या निर्णयाला आपण त्यावेळी विरोध केल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान या पुस्तकानंतर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसकडून अजित पवार यांना घेरण्यात आले आहे.

काय केला आहे पुस्तकात दावा
‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात मीरा बोरवणकर यांनी म्हटले आहे की, पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटले. त्याचबरोबर आसपासच्या पोलीस ठाण्याचा आढावा घेतला. एके दिवशी मला विभागीय आयुक्तांचा कॉल आला. त्यांनी सांगितले की, पुण्याचे पालकमंत्र्यांना तुम्हाला भेटायचे आहे. त्यांना तुम्ही एकदा भेटा. येरवडा पोलीस स्टेशनच्या जमिनीसंदर्भातील विषय आहे.

“मी पालकमंत्र्यांना सांगितलं की, येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे भविष्यात मोक्याच्या ठिकाणी जागा पुन्हा मिळणार नाही. शिवाय कार्यालयं आणि पोलीस वसाहतीसाठी आपल्याला या जागेची गरज असल्याचं मी त्यांना सांगितलं”, असं बोरवणकरांनी या पुस्तकात म्हटलं आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: