Monday, December 23, 2024
HomeBreaking NewsLPG Price | आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर एवढ्या रूपयांनी महागले...जाणून घ्या...

LPG Price | आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर एवढ्या रूपयांनी महागले…जाणून घ्या…

LPG Price : मागील महिन्यात व्यावसायिक सिलेंडर चे दर कमी केल्यानंतर या महिन्यात पुन्हा वाढविण्यात आले आहे. तर आज तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार म्हणजेच १ ऑक्टोबरपासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत २०९ रुपयांनी वाढणार आहे. या वाढीमुळे दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1731.50 रुपयांना उपलब्ध होणार आहे.

1 सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती 158 रुपयांनी कमी केल्या होत्या. यानंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1,522 रुपयांवर आली होती. ऑगस्टच्या सुरुवातीलाही तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती 99.75 रुपयांनी कमी केल्या होत्या.

अशा प्रकारे, गेल्या दोन महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती सुमारे 258 रुपयांनी कमी झाल्या आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत ताज्या वाढीचा परिणाम महागाईवर होऊ शकतो. विशेषतः, रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: