Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayमोठी बातमी | LPG घरगुती आणि व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतींमध्ये मोठी वाढ...

मोठी बातमी | LPG घरगुती आणि व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतींमध्ये मोठी वाढ…

होळीच्या आधी, सर्वसामान्यांना महागाईचा मोठा धक्का बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सामान्य लोकांना मोठा धक्का देत LPG सिलेंडरची किंमत वाढविली आहे. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर्स तसेच व्यावसायिक एलपीजी सिलेंडर्सची किंमतीत मोठी वाढ केली आहेत.

एलपीजी गॅस सिलिंडर किंमतीच्या दरवाढीच्या किंमती 50 रुपयांनी वाढविण्यात आल्या आहेत. यानंतर, दिल्लीतील 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत आता 1053 रुपयांवरून 1,103 रुपये झाली आहे.

घरगुती एलपीजी सिलेंडरबरोबरच व्यवसायिक एलपीजी गॅस सिलिंडर किंमतीच्या दरातही वाढ झाली आहे. व्यवसायिक एलपीजी सिलेंडर्सच्या किंमती 350.50 रुपयांनी वाढल्या आहेत. दिल्लीतील 19 किलो कमर्शियल सिलेंडरची किंमत 2069.50 रुपयांवरून 2119.50 रुपये झाली आहे.

देशातील गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडर किंमतीच्या भाडेवाढीची किंमत ठरवतात. कमर्शियल एलपीजी गॅस मुख्यतः हॉटेल्स, फूड शॉप्स इ. मध्ये वापरला जातो. यामुळे त्यांना किंमतींच्या घटातून मोठा दिलासा मिळेल अशी आशा होती.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: