Monday, December 23, 2024
Homeराजकीयभाजपची सांगली जिल्हा ग्रामीण कार्यकारणी बरखास्त करण्याची निष्ठावंत कार्यकर्त्यांची मागणी...

भाजपची सांगली जिल्हा ग्रामीण कार्यकारणी बरखास्त करण्याची निष्ठावंत कार्यकर्त्यांची मागणी…

सांगली प्रतिनिधी:- ज्योती मोरे.

सांगली जिल्हा भाजपाची ग्रामीण कार्यकारणी बरखास्त करावी अशी मागणी जिल्ह्यातील निष्ठावंत भाजपा पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी केली आहे.आज सांगलीतील आंबेसिडर हॉटेलमध्ये जिल्ह्यातील निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांसह माजी पदाधिकाऱ्यांची दुसरी बैठक पार पडली त्यावेळी सदर मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान आजपर्यंत भारतीय जनता पार्टीची धुरा कोणाचाही मुलाहिजा न ठेवता हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन सांभाळली. त्यामुळेच भाजपाला आज वैभव प्राप्त झाले आहे. हे यश पाहून इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी भाजपात प्रवेश करत आहेत, परंतु या लोकांच्या गर्दीत भाजपाचा मूळ निष्ठावंत कार्यकर्ता प्रवाहातून बाहेर ढकलला जातोय. या निष्ठावंतांच्या अभ्यासाचा आणि अनुभवाचा लाभ पक्षाने घेण्यासाठी या सर्व निष्ठावंतांना योग्य स्थानावर बसविले पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत अशा कार्यकर्त्यांनाही प्रवाहात घेणे आवश्यक असल्याचे व नवीन पदाधिकाऱ्यांकडून यांना सन्मान देण्यात यावा अशी इच्छाही यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.

सदर बैठकीस प्रदीप वाले कवठेमहांकाळ, योगेश लाड कुंडल, रविकांत साळुंखे, आनंदा गडदे गुंडेवाडी, धनसुख पटेल आरग, अशोक शिंदे पाटगाव, विनायक खरमाटे तासगाव, श्रीकांत शिंदे सांगली, स्नेहजीत पोतदार आटपाडी, संजय हिरेकर सांगली, शिवाजी जाधव पलूस, अजयकुमार वाले कवठेपिरान, शिवाजी जाधव आदी ज्येष्ठ निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: