Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनप्रेम म्हणजे उन्हात पडणारं अप्रतिम चांदणं, आणि तुम्हाला पुन्हा एकदा प्रेमात पाडायला...

प्रेम म्हणजे उन्हात पडणारं अप्रतिम चांदणं, आणि तुम्हाला पुन्हा एकदा प्रेमात पाडायला सादर आहे ‘बाई गं’ चित्रपटाचं नवीन गाणं ‘चांद थांबला‘…

मुंबई – गणेश तळेकर

रिमझिमत्या प्रेमाने, दुनियेला मोहिनी घालणारं ‘बाई गं’ चित्रपटाचं नवीन गाणं ‘चांद थांबला‘ रिलीझ झालय. मराठी मनोरंजन विश्वातील एक रोमँटिक हिरो अशी ओळख असलेला अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात आपल्या जुन्या ऑनस्क्रीन जोडीदारासोबत म्हणजेच प्रार्थना बेहेरे सोबत रोमान्स करताना दिसतोय.

साल २०१५ मध्ये आलेला चित्रपट मितवा नंतर आता हि जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमाल करायला तयार आहे .एका मोठ्या गॅप नंतर स्वप्नील आणि प्रार्थना एकत्र काम करतायत त्यामुळे आपल्या आवडत्या जोडी ला बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मागील काही दिवसात प्रार्थना ने आपल्या सोशल मीडियावर ह्या गाण्याची एक झलक फॅन्स ला दाखवली होती. या गाण्यात अभिनेता स्वप्नील जोशी प्रार्थना सोबत थिरकताना दिसत आहे. कलाकार आणि संगीत सोबतच या गाण्याचं चित्रीकरण सुद्धा तितकच सुंदर आहे.

नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘बाई गं’ चित्रपटाचा हे दुसरं गाणं आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे सह सुकन्या मोने, अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान सुद्धा आहे.

अभय जोधपूरकर आणि आनंदी जोशी ह्यांनी “चांद थांबला” ह्या गाण्याला आपला आवाज दिला आहे. तर वरून लिखते ह्यांचं संगीत आहे. गाण्याचे बोल समीर सामंत ह्यांनी लिहिले आहेत. “चांद थांबला” हे गाणं आपल्याला एवरेस्ट मराठी वर पहायला मिळेल.

या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कुष्णा जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहेत. तर ह्याचे संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे.

१२ जुलै पासून ‘बाई गं’ हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: