Sunday, December 22, 2024
Homeराज्यलुई ब्रेल जयंती दिव्यांग शक्ती कार्यलय येथे साजरी...

लुई ब्रेल जयंती दिव्यांग शक्ती कार्यलय येथे साजरी…

खामगाव – दि.06/1/2023 रोजी खामगाव येथे दिव्यांग बांधवासाठी कार्य करणाऱ्या विराट मल्टीपर्पज फाउंडेशन व साप्ताहिक दिव्यांग शक्ती खामगाव येथे लुई ब्रेल यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी दिलेली ब्रेल लिपी चे पूजन करत अंध व्यक्तींसाठी शैक्षणिक क्षेत्रात जीवनाची ढाल, अर्थात ब्रेल लिपि त्याचे संशोधक मा.लुई ब्रेल यांना जयंती निमित्त शब्दसूमनासह अभिवादन करुन शाल ,पुष्पगुच्छ,शुभेच्छा देवून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी ब्रेल लिपि वाचन प्रात्यक्षिक करुन आपले विचार प्रदर्शित केले. श्री.रामेश्वर टेकाडे (100% अंध )यांनी मा.श्री.लुई ब्रेल व ब्रेल लिपी विषयी थोडक्यात माहती देवून,अंधांच्या जिवनातील येणार्या समस्या व त्यावर करण्याचे उपाय योजना ब्रेल लिपिचा जीवनात होणारा जादूच्या छडीसारखा वापर याविषयी सर्वांशी चर्चासत्र संवाद साधला.

तर अंध असलेल्या दिव्यांग यांना होणाऱ्या समस्या व त्याचे निराकरण कसे करता येईल यावर विराट मल्टीपर्पज फाउंडेशन अध्यक्ष मनोज नगरनाईक यांनी विचार मांडले या कार्यक्रम वेळी वसंत चिखलकर,राहुल कळस्कार, राजेश मानकर, अजय वेरूळकर गट्टू जाधव, पप्पू जैन, सतीश पेंदाम, विनोद लांडे, विकास आंबेकर, शेखर तायडे आदी उपस्थिती होते देविदास कल्याणकर यांनी उपस्थिताचे आभार मानले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: