Monday, December 23, 2024
Homeकृषीसांगोळा परिसरातील टरबूज कांदा पिकाचे नुकसान, कर्मचारी संपावर असल्याने संबधित प्रशासनाचे दुर्लक्ष...

सांगोळा परिसरातील टरबूज कांदा पिकाचे नुकसान, कर्मचारी संपावर असल्याने संबधित प्रशासनाचे दुर्लक्ष…

भारत कृषक समाजाचे चेअरमन डॉ प्रकाश मानकर यांनी केली पाहणी…

पातूर तालुक्यातील तहसील अंतर्गत येत असलेल्या सांगोळा परिसरात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात टरबूज,कांदा ,हरभरा पिकाचे नुकसान झाले असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. या भागातील प्रशासन शेतावर पाहणीसाठी न गेल्याने संतप्त शेतकऱ्यांनी भारत कृषक समाजचे चेअरमन डॉ प्रकाश मानकर यांनी पाहणी करण्यासाठी बोलावून समस्यां सांगितल्या त्यानुसार डॉ प्रकाश मानकर यांनी मुख्यमंत्री यांना तत्काळ पत्र देऊन पंचनामा मदत देण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल असे अशावन शेतकऱ्यांना दिले आहे.

या परिसरात असलेल्या सांगोळा येथील टरबूज,कांदा, लिंबू, हरभरा आदी पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तुंलगा बु तुंलगा खुर्द, सांगोळा ,चतारी,सस्ती, दिग्रस बु,बाभूळगाव,लावखेड, आदी गावतील अवकाळी आलेल्या वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात झालेल्या पिकाचे नुकसानमूळे शेतकरी हवालदिल झाला आहे.या नुकसान बाबत संबधित कर्मचारी यांना भ्रमणध्वनी वरून नुकसान बाबत माहिती देण्यात आली आहे.

परंतु कर्मचारी यांनी पाहणी न करता अवहाल पाठवून देतो असे खोटे अश्वासण दिल्याचे शेतकरी मंगेश पोरे यांनी सांगितलं आहे.या मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्या मध्ये शेतकरी मंगेश पोरे यांचे दीड एकरातील टरबूज ,ज्ञानेश्वर पोरे यांचे २ एकर, तर कांदा पीक असलेले कमलाबाई पोरे,ज्ञानेश्वर तायडे,रमेश पोरे,नंदकिशोर पोरे,रवी पोरे,चंद्रकांत पोरे,गणेश पोरे,भाषकर महल्ले,सदानंद पोरे, ज्ञानेश्वर पोरे,नारायण पोरे,मनोहर शालीग्राम पोरे,कमलाबाई माणिकराव पोरे,

मोहन तेल्हारकर ,भगवान सोनोने,आदी पिकाचे नुकसान झालेले शेतकरी मोठ्या सँखणे उपस्थित होऊन शेतकऱ्यांनी भारत कृषक समाजाचे चेअरमन डॉ प्रकाश मानकर, संचालक गोविंद पाटील,तुंलगा येथील सरपंच खुशाल तायडे, विजय पाटील,पोलीस पाटील अशोक तायडे,माधव भरसाकळे, अवारे यांच्याकडे ऍड समस्यां मांडल्या आहेत.

सांगोळा या भागातील अवकाळी पावसाने झालेल्या शेतातील पिकाची नुकसान पाहणी करण्यात आली असून याबाबत मुख्यमंत्री यांना मेलद्वारे पत्र देण्यात आले असून त्यांना लवकर मदत मिळावी म्हणून प्रयत्न करण्यात येतील..

डॉ प्रकाश मानकर
चेअरमन
भारत कृषक समाज

आमच्या शेतातील टरबूज पीक पूर्ण पणे लिंबू एवढीगार पडल्याने पूर्णपणे नुकसान झाले आहे.प्रशासने तत्काळ पाहणी करून मदत देण्यात यावी..

मंगेश पोरे
शेतकरी सांगोळा

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: