सदर कार्यक्रम श्री क्षेत्र आलेगाव देवस्थानाच्या मदतीने महानुभाव विधी नुसार करण्यात आला…
पातूर – निशांत गवई
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सन २०२४ मध्ये राष्ट्र पुरुष थोर व्यक्ती जयंती व राष्ट्रीय जयंती साजरी करण्याबाबत परिपत्रकात या वर्षी महानुभाव पंथाचे आद्यप्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अवतार दिनानिमित्त जयंती कार्यक्रमामध्ये नव्याने समावेश केला शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय निमशासकीय कार्यालय तथा विद्यालयात साजरा करण्यात आला, त्याच प्रमाणे आलेगाव येथील विविध ठिकाणी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतारदिन लाड पूजारी परिवार यांच्या उपस्थिती मध्ये चरणाकित विशेषचे विधिवत पूजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्राम पंचायत आलेगाव,वन विभाग,नूतन विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला सदर कार्यक्रम महानुभाव विधी नुसार
भगवान श्री चक्रधर स्वामींच्या चरण स्पर्शाने पवित्र पाषाणाच्या मूर्तीचे ग्राम पंचायतमध्ये सरपंच गोपाल पाटील यांचे हस्ते तर वन विभागामध्ये वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या हस्ते पूजन, फुलहार, विडा अवसर अर्पण करण्यात आला व नूतन विद्यालयात मुख्याध्यापक वसंत राठोड व शिक्षकांनी चंदनाने, फुल हार अर्पण करून पूजन केले.तसेच महिला शिक्षिकानी विडा अवसर अर्पण केला.
यावेळेस नूतन विद्यालयात अनुप लाड यांनी भगवान श्री चक्रधर स्वामींचे अवतार कार्या विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली त्यांनी म्हंटले ११ व्या शतकात क्रांतीने नव्हे तर प्रबोधनाने परिवर्तन घडविणारे,जन सामन्याच्या बोली भाषेत सत्य धर्म ज्ञान देणारे ,स्त्री शिक्षणाचा प्रारंभ करून पुढील समाजसुधारकानां प्रेरणा देणारे आद्य शिक्षक म्हणजेच भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन शिक्षक दिनी साजरा होत आहे हा दुग्धशर्करा योग आहे.
पुढे माहिती देताना ते म्हटले डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात देखील महानुभाव पंथाबद्दल आदर व प्रेम होते त्यांनी महानुभाव शास्त्राचा आभ्यास केला.आजच्या शुभदिनी श्री चक्रधर स्वामींचे विचार आचार आपल्या जीवनात उतरवून आत्मोद्धार ते समाजोद्धार करीत भारत देश समृद्ध करुयात असा संकल्प आजच्या दिवशी आपण घेऊया तसेच शिक्षक मांगुळकर यांनी श्री चक्रधर स्वामींचा अवतार आणि महाराष्ट्र पदभ्रमना बाबत मनोगत व्यक्त केले.अनेक विद्यार्थिनींनी शिक्षक दिनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून मनोगत व्यक्त केले.
तसेच वन विभागामध्ये श्रीधर लाड यांनी ससा रक्षण लिळा सांगून अहिंसेचे महत्त्व वन विभाग कर्मचाऱ्यांना पटवून दिले.कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थांचा देखील उत्साह बघायला मिळाला अनेक विद्यार्थिनीनीं स्वामींच्या अवतार कार्य विषयी भाषणे दिली.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक,शिक्षक वृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी, ज्येष्ठ पत्रकार नय्यर खान (गुड्डू) उपस्थित होते.
ग्राम पंचायत मध्ये सरपंच गोपाल गणपतराव महल्ले,पंचायत समितीचे उपसभापती इमरान खान,संजय गावंडे, डॉ.राजू,गणेश पातुरे,इरफान भाई,भिमराव तेलगोटे, देविदास पदमने,सदानंद लहामगे ग्राम पंचायत कर्मचारी नागेश मोहाडे,गजेंद्र तेल गोटे,भिमराव मोहाडे उपस्थित होते. वन विभागामध्ये वन परिक्षेत्र अधिकारी गव्हाणे वन विभाग कर्मचारी कार्यक्रम स्थळी आलेगाव येथील भगवान श्री चक्रधर स्वामींच्या देवस्थानाच्या वतीने श्रीधर लाड, अनुप लाड यांनी उपस्थित राहून विधिवत कार्यक्रम करून घेतले.