Saturday, November 23, 2024
Homeसामाजिकलंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी त्यांची सर्व पुस्तकांच्या प्रती व...

लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी त्यांची सर्व पुस्तकांच्या प्रती व स्मृतीचिन्हे ऊपलब्ध करून सुशोभीकरणासाठी प्रयत्न करणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे…

अभ्यासदौऱ्यावरील शिष्टमंडळाने लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवस्थानाला दिली भेट.

धीरज घोलप

सन्माननीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण मनामध्ये कायम राहीलच परंतु इथल्या परिसराचे सुशोभीकरण, निवस्थानातील अंतर्गत व्यवस्था आणखीन सुंदर कशी करता येईल यासाठीचे काम निश्चितपणे करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

अभ्यासदौऱ्यावरील शिष्टमंडळाने शुक्रवार, दिनांक ०१ सप्टेंबर, २०२३ रोजी लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवस्थानाला भेट दिली. यावेळी डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. याप्रसंगी केंद्र सरकारच्या नेहरू सेंटरचे श्री. संजयकुमार शर्मा, निवासस्थान व्यवस्थापक श्री. फहाद उपस्थित होते.

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निवास्थानाला महाराष्ट्र सरकाने शासकीय दर्जा दिला आहे. त्यामुळे येथील उपक्रमात सहभागी होण्याची संधी महाराष्ट्र सरकाने लोकांना उपलब्ध करून दिली आहे.

हे फार चांगले पाऊल महाराष्ट्र शासनाने ऊचलेले व सरकारतर्फे ऊत्तम निगराणी केली जात आहे त्याबद्दल समाधान व्यक्त करून इथे असलेली व्यवस्था ही आणखीन समृद्ध कशी करता येईल यावर काम करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: