एकाच रात्रीत १०५ मि.ली.पावसाची नोंद लोणार तहसिलदारांकडून पाहणी !
लोणार तालुका प्रतिनिधी सागर पनाड
लोणार तालुक्यातील सुलतानपूर मंडळात ९ आक्टोंबरच्या रात्री १० वाजता पावसाला सुरवात झालेल्या पावसाने वारा व विजांच्या कडकडासह उग्र रुप धारण करुन १० आक्टोबरच्या सकाळी ५ वाजेपर्यंत ढगफुटी सदृश कोसळणाऱ्या या पावसाने महसूल दप्तरी १०५ मि .ली. पावसाची नोंद करुन नागरीकांच्या घरांचे व शेतमालाचे आतोनात नुकसान केले आहे.
दरम्यान लोणारचे तहासिलदार सैफन नदाफ यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह गावाला भेट देउन घरात पाणी शिरून बाधीत झालेल्या घरांची पाहणी करुन ग्रामपंचायत व महसुल कर्मचाऱ्यांना बाधीत घरे व शेतातील नुकसानीची पाहणी करुन संयुक्तीक पंचनामे बनवण्याचे आदेश दिले आहेत . यावेळी त्यांच्या समवेत नायब तहसिलदार श्रीमती परळीकर , मंडळाधीकारी , जे .एम. येऊल , ग्रामविकास अधिकारी संतोष क्षिरसागर , तलाठी के .एल. फोलाने , भाकडे , सोनुने , गावंडे , महसुल सहायक तुपकर , ग्रा.प. कर्मचारी सिध्देश्वर सुरुशे व भिकाजी भानापूरे हे होते.
सदरच्या पावसामुळे गावातील वार्ड क्र .१ , ५ , व ६ मधील बहुतेक नागरीकांच्या घरात पाणी शिरून घरात उदरनिर्वाहासाठी ठेवलेल्या धान्यांचे तसेच जिवनावशक वस्तूंचे नुकसान झाल्याने कालची आखी रात्र मुलाबाळासह जागुन काढलेल्या नागरीकांच्या घरांनी सध्या ही पाणी झिरपत असल्याने येणारी रात्र काढायची कशी या चिंतेने त्यांना ग्रासले आहे .
सुलतानपूर मंडळातील शेती पिकांचे देखील अतोनात नुकसान !
सदरच्या ढगफुटी सदृश कोसळलेल्या पावसामुळे सुलतानपूर कृषी मंडळातील शेतमालाचे सुध्दा अतोनात नुकसान झाले असून सोंगणीस आलेल्या व सोंगून ठेवलेल्या सोयाबीनचे मोठया प्रमाणात नुकसान होतांना दिसत आहे .
सरसगट विमा व शासकीय नुकसान भरपाईची मागणी !
या मंडळात मागील तीन वर्षापासून ओला दुष्काळ पडून देखील शेतकऱ्यांना पिक विमा व शासनाच्या नुकसान भरपाई पासून वंचीत ठेवण्याच काम संबधीत यंत्रणांकडुन होत असून
किमान यावेळी तरी नजर अंदाज पंचनामे गृहीत धरून सरसकट पिका विमा व शासनाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे .