नागपूर – शरद नागदेवे
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच “वन नेशन वन इलेक्शन” ही संकल्पना मांडली. यासंदर्भात एक समिती तयार केली. यावर देशात मतभिन्नता आढळून येत आहे. ही संकल्पना संविधानिक दृष्टिकोनातून कशी अंमलात आणता येईल, या संदर्भातील विचार मतदारांच्या लक्षात यावे म्हणून लोकगर्जना प्रतिष्ठानने एका चर्चेचे आयोजन केले आहे.
या चर्चेत नागपूर शहरातील प्रसिद्ध वकील सर्वश्री ॲड. श्रीरंग भंडारकर आणि ॲड. फिरदौस मिर्झा आपले विचार व्यक्त करतील. हा कार्यक्रम *रविवार दि.10 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राष्ट्रभाषा येथील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह, शंकरनगर चौक, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन लोकगर्जना प्रतिष्ठानचे शुभंकर पाटील यांनी केले आहे.