सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनिता भालेराव
अकोला, – संतोषकुमार गवई
लोकसभा निवडणूकीच्या दि. 26 एप्रिल रोजी मतदानासाठी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 307 मतदान केंद्रांवर पूर्वतयारी करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक निवडणूक अधिकारी अनिता भालेराव यांनी दिली.
त्या म्हणाल्या की, या विधानसभा मतदारसंघात 1 लाख 67 हजार 936 पुरूष व 1 लाख 64 हजार 805 महिला, तसेच 22 तृतीयपंथी असे एकूण 3 लाख 32 हजार 763 मतदार आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.
केंद्रांवर उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी शेड लावून सावलीची व्यवस्था, पेयजल, पंखे, स्वच्छतागृह, दिव्यांगासाठी व्हीलचेअर व ऑटोरिक्षाची व्यवस्था आहे. मतदारसंघात वृद्ध व दिव्यांगांचे 92 टक्के गृह मतदान पूर्ण झाले.दिव्यांग मतदारांसाठी विभागनिहाय ऑटोरिक्षा सुविधाश्रीमती भालेराव म्हणाल्या की, दिव्यांग मतदारांसाठी ऑटो संघटनेच्या सहकार्याने विशेष सेवा दिली जात आहे.
ही सेवा मिळविण्यासाठी मदत कक्षाचा फोन क्र. (0724) 2404225 असा आहे.शहराचा मध्य भाग (बैदपुरा, राजपुतपुरा, गांधी रस्ता, मो. अली रस्ता व शहराचा मध्य भाग व इतर) यासाठी इलियास खान लोदी, श्रमिक कामगार संघटना, मो. नं. 8830324630 आणि उबेद खान इद्रिस खान, सदस्य मो.नं. 8149009912 यांच्याशी संपर्क साधावा.पश्चिम भाग (जुने शहर व डाबकी रस्ता) यासाठी संतोष शर्मा यांच्याशी मो.नं.9822193716 या क्रमांकावर आणि दक्षिण झोन (खदान, सिंधी कॅम्प, कौलखेड व इतर)
यासाठी शाकीर हुसेन खान, एकता ऑटो रिक्षा संघटना व मो. मुस्तकिम गु. मुस्तफा यांच्याशी मो.नं.9325034268 त्याचप्रमाणे, दीपक वगारे क्र. 8975139312, रामेश्वर अहिर 9763510455 या क्रमांकावर संपर्क साधावा.उत्तर झोन (अकोट फैल, नायगाव व इतर) सैय्यद इमरान सैय्यद एजाज यांच्याशी 7620391303 व अशफाक शाह सैफुल्ला शाह यांच्याशी 9922477566 वर संपर्क साधावा.ज्या दिव्यांग मतदारांना स्वत:हून मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यास अडचण आहे अशांनी या सेवेचा लाभ घ्यावा व मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन श्रीमती भालेराव यांनी केले.