रामटेक – राजु कापसे
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 नुकतीच पार पडलेली असून सदर निवडणूक सुरळीत पणे पार पाडण्याकरिता आचार संहिता कक्ष स्थापन करून उपविभागीय स्तरावर विविध शासकीय कार्यालयातिल अधिकारी कर्मचारी यांना निवडणुकीची विविध जबाबदारी सोपविण्यात येते व निवडणुकीचे काम सुरळीतपणे त्यांच्याकडून पार पाडण्याची जबाबदारी सोपविण्यात येते.
सदर निवडणूक काळाकरिता सर्व अधिकारी कर्मचारी यांना अति कालीन भत्ता म्हणून एक महिन्याचे मूळ वेतन इतके वेतन देण्याबाबत दिनांक एक जुलै 2024 रोजी अवर सचिव व उप मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी शासन निर्णयानुसार सर्व विभागास कळविलेले आहे.
शासन निर्णयानुसार निवडणूक कार्य सोपवलेले सर्व अधिकारी कर्मचारी यांना एक महिन्याचे मूळ वेतन इतके वेतन देय असताना सुद्धा निवडणूक कार्यकरिता महत्त्वाचे काम ज्यांच्याकडे असते असे भरारी पथक,व्हिडिओ रेकॉर्डिंग पथक स्थिर निगराणी पथक व्हिडिओ विविंग पथक यामध्ये असलेले अधिकारी यांना दिनांक 5 सप्टेंबर 2024 चे पत्रानुसार पूर्ण निवडणूक कालावधी करिता फक्त 1000 रुपये अति कालीन भत्ता देणे बाबत पत्र माननीय उपजिल्हाधिकारी निवडणूक नागपूर यांच्याकडून आलेले आहे.
त्या अनुषंगाने मा.उपजिल्हाधिकारी निवडणूक नागपूर व रामटेक चे उपविभागीय अधिकारी यांना सर्व आचार संहिता कक्षा अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी कर्मचारी तसेच सर्व पथकातील अधिकारी कर्मचारी यांना एक महिन्याचे मूळ वेतन अति कालीन भत्ता म्हणून मिळणेबाबत निवेदन देण्यात आले आहे.
एक हजार रुपये संपूर्ण निवडणूक काळाकरिता नसून फक्त निवडणूक काळात साहित्य वाटप, साहित्य घेणे या कमा करिता जबाबदारी देण्यात आलेले अधिकारी कर्मचारी यांना एक दिवसाकरिता देय असलेले मानधन असल्याचे दिनांक 23 मार्च 2024 चे मा.सहाय्यक निवडणूक अधिकारी नई दिल्ली यांचे आदेश असल्याबाबत माहिती सर्व पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेले असून एक जुलै 2024 चे शासन निर्णय नुसार सर्व पथकातील अधिकारी कर्मचारी यांना सुद्धा एक महिन्याचे मूळ वेतन अतिकलन भत्ता म्हणून देण्याबाबत मागणी संपूर्ण नागपूर जिल्ह्यात होत आहे.