Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजन"लोच्या कॉपीचा" हरवलेल्या प्रेमाची गोष्ट…

“लोच्या कॉपीचा” हरवलेल्या प्रेमाची गोष्ट…

मुंबई – गणेश तळेकर

लोच्या कॉपीचा, असे शीर्षक वाचले की कॉपी प्रकरण आणि त्यासाठी करावा लागणाऱ्या भानगडी, असे काहीसे कथानक आपल्या समोर येईल. मात्र धक्कादायक वळणे घेत अभ्यासाच्या हरवलेल्या हरवलेल्या प्रेमाची गोष्ट रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल.

ब्ल्यू हेवन एंटरटेन्मेंट निर्मित व परशुराम शिंदे प्रस्तुत लोच्या कॉपीचा चित्रपट येत्या शुक्रवारी १६ फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येत आहे. विजय, नागेश, मीनू, ओंकार आणि प्रिया अशा प्रमुख पाच कलाकारांबरोबर इतर कलाकार असणाऱ्या या चित्रपटात कॉपी या विषयाला अनुसरून कथानक रसिकांना नक्कीच विचार करायला लावेल.

वरील पाच जण एका गावात शाळेत शिकताना पास होण्यासाठी कॉपीचा आधार कसा घेतात आणि कथानक कसे वळण घेते, यासाठी चित्रपट पाहायला हवा. कॉपी करणे जसे चुकीचे आहे, त्याप्रमाणे पालकांच्या अवास्तव अपेक्षेमुळे आजची मुले कोणते टोकाचे पाऊल उचलू शकतात, असे पडद्यावर कथानक पाहताना मायबाप प्रेक्षक स्वतःला हरवून जाईल.

चित्रपटात प्रवीण भाबल, नवीन कदम, ओंकार कांबळी, चैताली राऊत आणि श्रद्धा कट्टीमणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. निर्माता अमित अशोक काकडे, तर कार्यकारी निर्माता स्वप्नील अनंत पवार (नाना) आहेत.

दिग्दर्शक अक्षय सुतार, संगीत दिग्दर्शक मितेश चिंदरकर/विनय शिर्के, गीते श्वेता बसनाक पाटील/विनय शिर्के, संकलन श्वेता बसनाक पाटील यांचे आहे तर संगीत झी म्युझिक कंपनीचे आहे

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: