सांगली – ज्योती मोरे.
सांगली शहरातील बुरुड गल्लीतील शिवमुद्रा चौकात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघा आरोपींना अटक केली. गेल्या काही दिवसांपासून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यात नशेच्या गोळ्यांची विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
त्या संदर्भात कारवाईच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिल्या होत्या. त्याप्रमाणे पेट्रोलिंग करत असताना,आज खास बातमीदारांने दिलेल्या माहितीनुसार सांगलीतील बुरुड गल्लीतील शिवमुद्रा चौकात अनिकेत विजय कु. वय वर्षे- 21, राहणार- गुजर बोळ,बचरुड गल्ली आणि उमर सलीम महात वय वर्षे 20,राहणार गवळी गल्ली दोघेही राहणार सांगली.
हे नसेच्या गोळ्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांने छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले. अनिकेत कुकडे याच्या जवळ अकराशे तीस रुपयांच्या निट्रावेट 10 एमजी,एन आर एक्स नीट्राझिपाम आयपी 10 एमजी, दोन्ही मिळून 150 गोळ्या तर 445 रुपये किमतीच्या निट्रोसन 5 एन. आर. एक्स. निट्राझिपाम आय.पी.5 या शंभर गोळ्या तर उमर महात याच्याजवळ बाराशे रुपये रोख रक्कम मिळून आली.
सदर गोळ्यांबाबत चौकशी केली असता त्यांनी सदर गोळ्या या कर्नाळ रोडवरील शहाबाज शेख उर्फ जग्वार याच्याकडून घेतल्याचे सांगितले.
सदर मुद्देमाल आणि आरोपींना सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय. या गुन्ह्यातील अनिकेत कुकडे हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरी, एनडीपीएस अॅक्ट ,शरीरा विरुद्ध अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, सुधीर गोरे, बिरोबा नरळे ,मच्छिंद्र बर्डे ,संदीप पाटील, उदय माळी, अनिकेत कोळेकर ,सागर लवटे ,सागर टिंगरे, राहुल जाधव, संकेत मगदूम ,अजय बेंद्रे ,गौतम कांबळे, संतोष गळवे, विक्रम खोत आदींनी केली आहे.