सांगली – ज्योती मोरे
इस्लामपुरातील यल्लमा चौकात खंडागळे यांच्या पानपट्टी जवळ कमरेला कोयता लावून दहशत वाजवणाऱ्या मंगेश सुखदेव खैरे वय 32 राहणार यल्लमा चौक, बुरुड गल्ली इस्लामपूर या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला कोयता आढळून आला.
सदर कोयता जप्त करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध इस्लामपुर पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीस पुढील तपासासाठी इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार,मारुती साळुंखे, गजानन घस्ते,सुनील चौधरी, राहुल जाधव, सचिन धोत्रे,हेमंत ओमासे ,ऋषिकेश सदामते, संकेत कानडे,अजय बेंद्रे,बजरंग शिरतोडे आदींनी केली.