सांगली प्रतिनिधी:– ज्योती मोरे
कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन बंद घरांची कुलपे तोडून चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह आज गणेश विजय डोईफोडे वय 25 वर्षे, राहणार शिवनेरी नगर कुपवाड या सध्या हद्दपार असलेल्या आरोपीस खास बातमीदाराच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कुपवाड सूतगिरणीच्या टेकावरून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आले असून, त्याच्या जवळून 35000 रुपये किमतीचे 13. 80 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, 4000 रुपये किमतीचे कानातील टॉप्स, 15.700 ग्रॅमचे 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण असा एकूण 79 000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दरम्यान विविध गुणण्यामधील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते. सदर पथका कडून तपास चालू असताना, सदर पथकातील अंमलदार आर्यन देशिंगकर व प्रशांत माळी यांना ही माहिती खास बातमीदारा मार्फत आरोपी सूतगिरण परिसरात आल्याची मिळाली होती.
सदर आरोपीस पुढील तपास कामी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर, पोलीस अंमलदार सुधीर गोरे, दीपक गायकवाड, राजू मुळे, सचिन धोत्रे, हेमंत ओमासे, प्रशांत माळी ,आर्यन देशिंगकर ,अजय बेंद्रे, ऋतुराज होळकर, संकेत कानडे, कॅप्टन गुंडवाडे आदींनी केली.