सांगली – ज्योती मोरे
दुजाकींसह ट्रॅक्टर ट्रॉली चोरणाऱ्या पाच जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीच्या पथकाने मिरज तालुक्यातील बोलवाड मधून ताब्यात घेतल.आरोपींकडून एकूण 8 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, सांगली जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्याच्या सूचना दिल्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार करून त्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास सुरू असताना खास बातमीदारांने बसवराज बाळाप्पा नाईक.वय वर्षे -24,राहणार- शिवाजीनगर, पलूस.
मुळगाव- आडवा रस्ता बोलवाड, तालुका- मिरज. ओंकार विष्णू नाईक. वय वर्षे- 21,राहणार -शिवाजीनगर, पलूस,मुळगाव -आडवा रस्ता बोलवाड,तालुका- मिरज. ओंकार महेश तांदळे.वय वर्ष- 19,राहणार – बेडग,तालुका- मिरज.सिद्धार्थ पांडुरंग खोत. वय वर्षे-21.राहणार- विठुरायाची वाडी,तालुका -कवठेमंकाळ,
आणि विश्वजीत गिरजाप्पा खोत.वय वर्षे -20, राहणार- विठुरायाची वाडी, तालुका -कवठेमंकाळ.यांनी चोरी केलेल्या मोटरसायकली बोलवाड, तालुका -मिरज. येथे लावल्या असल्याचं आणि त्या गाड्या विक्री करणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बोलवाड इथे जाऊन पाहनी केली असता,
एका घराच्या समोर गाड्या लावल्याचा आढळून आले याची चौकशी केली असता, सदर घरातून काही तरुण बाहेर पडले त्यांना सदर गाड्यांची माहिती विचारताना त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांची चौकशी केली असता,त्यांनी आपली ओळख सांगितली.सदर गाड्यांन विषयी विचारणा केली असता, या गाड्या भारती हॉस्पिटल, अहिल्यानगर चौक,