कोकणाच्या खेडमध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलीय. या सभेसाठी प्रचंड जनसमुदाय उसळला आहे. उद्धव ठाकरे काय बोलणार अयावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच सभा आयोजित करण्यात आलीय. या सभेसाठी कार्यकर्त्यांच्या प्रचंड मोठी गर्दी कार्यक्रमस्थळी बघायला मिळाली…